घरताज्या घडामोडीBreaking : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, ब्रीचकँडीमधून डिस्चार्ज!

Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, ब्रीचकँडीमधून डिस्चार्ज!

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारांसाठी ते मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवू लागल्यानंतर सावधतेचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना काळात त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी दौरे केले होते. तसेच, अतिवृष्टी झालेल्या भागाचा देखील त्यांनी दौरा केला होता. त्यानंतर लक्षणं जाणवू लागल्यानंतर ते काही काळ होम क्वारंटाईन झाले होते. मात्र, नंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारांनंतर आज ते कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

लॉकडाउनच्या काळामध्ये अजित पवार यांनी आढावा बैठका तसेच राज्यातील कामकाजासंबंधी बैठकांचा धडाका लावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः मातोश्रीमधून राज्याचा कारभार चालवत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मंत्रालयात दररोज न चुकता हजेरी लावत होते. तसेच विविध आढावा बैठक घेत होते. त्याचप्रमाणे राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. अर्थात हे सर्व करत असताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांनी काटेकोरपणे दक्षता बाळगली होती. तोंडावर कायमस्वरूपी मास्क, हात सातत्याने सेनिटाईज करणे आणि लोकांशी तसेच अधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलताना, वावरताना काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशी काळजी अजित पवार कटाक्षाने घेत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -