आकाश-श्लोकाच्या लग्नाची तारीख ठरली हो…!

मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि त्याची होणार बायको श्लोका यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

Mumbai
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता

उद्योगपती मुकेश अंबानी याच्या मुलीच्या लग्नानंतर आता त्याचा मुलगाही घोडी चढणार आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि त्याची होणार बायको श्लोका यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. पुढील महिन्यातील ९ तारखेला आकाश आणि श्लोकाचा विवाह होणार असून त्यानंतर १० मार्च रोजी वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. तर ११ मार्चला या दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा जियो सेंटरमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे.

वाचा – असा झाला आकाश अंबानीचा साखरपुडा!

मुंबईत होणार शाही विवाह सोहळा

मुकेश अंबानी यांची सोयरीक हिरे व्यापारी रसेल मेहता यांच्यासोबत जुळली आहे. आकाश आणि श्लोका लहानपणापासूनचे मित्र आहेत. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला आहे. ९ मार्च, शनिवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्ट येथे जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. नुकतेच ईशा अंबानी हिचा लग्न सोहळा संपन्न झाला. त्याला जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच आकाश आणि श्लोकाच्या लग्नालाही विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

वाचा – आकाश अंबानीच्या साखरपुड्याच्या पार्टीत नीता अंबानींचा ठुमका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here