घरमुंबईवादग्रस्त पार्श्वभूमी असलेले अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर

वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर

Subscribe

एआयएमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू

अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. अचानक त्यांची प्रकृती खूप खालावली आहे. एआयएमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी समर्थकांना अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन केलं आहे.

२०११ मध्ये असदुद्दीन ओवेसी यांना एका घटनेत गोळी लागली होती. तसेच चाकूने केलेल्या वारमुळे ते गंभीर जखमी झाले होते. ती गोळी अकबरुद्दीन ओवेसी यांच्या पाठीच्या कण्याजवळ लागली होती. अकबरुद्दीन ओवेसी रुग्णालयात दाखल करण्या अगोदर त्यांनी उलट्या होऊ लागल्या आणि पोटात दुखायला लागलं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लंडनमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

- Advertisement -

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन्न रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रकृती सुधारावी, यासाठी प्रार्थना केली आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याबाबत आंध्र प्रदेश मुख्यमंत्री वायएस जगन मोहन्न रेड्डी यांनी ट्विट केलं आहे.

- Advertisement -

अकबरुद्दीन ओवेसी कोण आहेत?

अकबरुद्दीन ओवेसी हे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू आहे. अकबरुद्दीन ओवेसी हे हैदराबाद चंद्रयानगुट्टाचे आमदार आहेत. वादग्रस्त विधान करणारी पार्श्वभूमी अकबरुद्दीन ओवेसी यांची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -