घरमुंबई..तर ट्रॅक्टरला परवानगी द्या

..तर ट्रॅक्टरला परवानगी द्या

Subscribe

मोटार वाहनांना बंदी असणार्‍या माथेरानमध्ये विकास कामांसाठी सध्या ट्रॅक्टर वापरला देण्यात आलेल्या परवानगीमुळे स्थानिक राजकारण तापले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ही परवानगी दिली असली तरी हा आदेश शहरासाठी असलेल्या इको झोन अधिसूचनेचे उल्लंघन करणारा आहे, मात्र जर ठेकेदाराला अशी परवानगी मिळत असेल तर ती सर्वसामान्य माथेरानकरांना देखील द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे प्रमुख असताना शहर विकासासाठी त्यांनी १२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यातून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. दस्तुरी नाका ते शार्लोट लेक हा मुख्य रस्ता माती, पेव्हर वापरून दुरुस्त करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जात आहे. शहराची पारंपरिक पद्धतीने असलेली वाहतूक व्यवस्था वापरून या रस्त्याचे काम करण्याबाबत निविदा काढण्यात आली आणि आता प्रत्यक्ष काम करताना वाहतुकीसाठी ट्रॅक्टर वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -

मोटार वाहनांना बंदी असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले असून, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा अवमान झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या ठेकेदाराला जर नियमाला बगल देऊन परवानगी दिली जात असेल तर मग स्थानिक व्यापार्‍यांनादेखील मिळावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. नगर परिषदेला यापूर्वी कचर्‍यासाठी ट्रॅक्टर वापरण्याची अनुमती अधिसूचनेद्वारे देण्यात अली होती. नंतर पर्यावरणवाद्यांच्या हरकतीनंतर ही परवानगी रद्द करण्यात आली. या प्रश्नावर आजवर आक्रमक भूमिका घेणारी स्थानिक अश्वपाल संघटना अजून गप्प का, यासंदर्भात खरोखर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाले आहे का, आणि जो न्याय ठेकेदाराला मिळाला तो स्थानिक नागरिकांना आणि व्यापार्‍यांना मिळेल का, यावर उलट सुलट चर्चा सुरू आाहे.

आमच्या मालाची वाहतूक हातगाडी आणि घोड्यांवरून होत असते. घोड्यांवरून आलेल्या मालाचे भरपूर प्रमाणात नुकसान होत असते. यासाठी एमएमआरडीए ठेकेदाराप्रमाणे माल वाहतुकीकरिता व्यापार्‍यांनाही ट्रॅक्टरची परवानगी देण्यात यावी.
-राजेश चौधरी, अध्यक्ष, माथेरान व्यापारी फेडरेशन

- Advertisement -

एमएमआरडीएने नेमलेल्या ठेकेदाराला मानवी श्रमाद्वारे कामांसाठी अतिरिक्त कोट्यवधींची किंमत मोजण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात वाहनबंदी असलेल्या आमच्या शहरात जिल्हाधिकार्‍यांनी ट्रॅक्टरला परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने माथेरानकरांनादेखील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर, तसेच स्मशानभूमीसाठीच्या सरपणाची वाहतूक करण्यासाठी परवानगी द्यावी.
-बबिता शेळके, माजी नगराध्यक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -