घरमुंबईशुल्क भरू न शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांकडून तीस लाखांची मदत 

शुल्क भरू न शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांकडून तीस लाखांची मदत 

Subscribe

सायनमधील शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलने माजी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले.

कोरोनामुळे रोजगार ठप्प झाले असून, अनेकजण मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आर्थिक संकटामुळे पालकांना शाळेचे शुल्क भरणे व ऑनलाईन शिक्षण घेणे अडचणीचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सायनमधील शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलने माजी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले. माजी विद्यार्थ्यांनी या कठीण प्रसंगात शाळेची साथ देत विद्यार्थ्यांना मोबाईल-टॅब पुरवण्याबरोबरच शाळेला तीन लाखांपर्यंत आर्थिक सहाय्यही केले.

सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने या कठीण काळावर यशस्वी मात करण्याचा निर्धार केला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेचे शुल्क भरु शकत नसल्याने त्यांना आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक ताणाला सामोरे जावे लागू नये यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करण्यात येत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी नितीन करमरकर यांनी शाळेला २५ लाखांची मदत केली आहे. ही रक्कम शाळेतील विविध उपक्रम राबवण्यासाठी वापरली जाणार आहे. शाळेच्या आवाहनाला प्रतिसाद देत १९८६ च्या दहावीच्या बॅचमधील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येकी ११ हजारांची मदत केली आहे. त्यातून शाळेला साडेचार लाखांचा निधी उपलब्ध झाला. शाळेचे माजी विद्यार्थी अमेरिकास्थित रोहित मांडगे यांनी शाळेला ५० हजारांची मदत केली आहे. नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही पॉकेटमनी वाचवून शाळेकडे आपले योगदान म्हणून ८ हजार रुपये सुपूर्द केले. शाळेने मला घडवले, शाळेविषयीची कृतज्ञता म्हणून मी शाळेला २५ लाखांची देणगी दिली अशा शब्दांत नितीन करमरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेतील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला शाळेच्या माजी शिक्षिका आशा करमरकर यांचे नाव देण्यात आले.

खेळ, संगीत, स्पोकन इंग्रजी, मानसिक समुपदेशन असे शाळेकडून राबवण्यात येणारे उपक्रम कोरोना काळातही बंद झालेले नाही. ऑलनाईन माध्यमातून शाळेचे सर्व उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवत आहोत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात निधीची कमतरता भासू नये, या हेतूने माजी विद्यार्थी शाळेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत आहेत.
– राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -