वस्तू परत करणाऱ्या ग्राहकांना अॅमेझॉनचा रामराम!

amazon
प्रातिनिधिक फोटो

घरबसल्या हव्या त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी अॅमेझॉन कंपनी प्रसिद्ध आहे. जगभरातून ३०० दक्षलक्ष लोक अॅमेझॉनच्या वेब पोर्टलवरुन विविध वस्तूंची खरेदी करतात. सोबतच घरी आलेली वस्तू पसंत न पडल्यास नियोजित वेळेच्या आत परतही करतात. परंतु, अॅमेझॉनने आता वस्तू परत करणाऱ्या ग्राहकांना रामराम ठोकायला सुरुवात केली आहे.

‘द वॉल स्ट्रीट जनरल’ने दिली बातमी
अॅमेझॉन या नामंकित ऑनलाईन शॉपिंग पोर्टलने काही युजर्सला बॅन करण्याची बातमी ‘द वॉल स्ट्रीट जनरल’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या बातमीमध्ये बॅन केलेल्या युजर्सचे अनुभव सांगण्यात आले आहेत. यामधील काही सुजर्सनी त्यांना कुठल्याही प्रकारची वॉर्निंग न देता कंपनीने बॅन केले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

एकदा विकलेली वस्तू पुन्हा घेतली जाणार नाही
देशाच्या बाजारामध्ये बहुतेक दुकानांमध्ये ‘एकदा विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही’ अशा पाट्या लागलेल्या दिसतात. याच पाट्यांचे अनुसरण आता अॅमेझोननेही करण्याचे ठरविलेले दिसत आहे. आतापर्यंत अॅमेझॉनवर खरेदी केलेली वस्तू ग्राहक कंपनीने ठरविलेल्या दिवसांच्या आत परत करु शकत होते.

ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न
दरम्यान, अॅमेझोनच्या या निर्णयावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका ग्राहकाने अॅमेझॉनला कमेंटमध्ये प्रश्न विचारला की, खरेदी केलेल्या वस्तू परत करणाऱ्या ग्राहकांना अॅमेझॉन बॅन करत आहे का? यावरती उत्तर देताना अॅमेझॉनने सांगितले की, ग्राहकांना कंपनीच्या सुविधांमध्ये काही त्रृटी जाणवत असतील तर त्यांना थेट आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करु.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here