घरमुंबईफेरीवाल्यांच्या मुजोरीमुळे आग विझवण्यास उशीर!

फेरीवाल्यांच्या मुजोरीमुळे आग विझवण्यास उशीर!

Subscribe

या प्रकारानंतर अंबरनाथ शहर आणि परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे .    

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीला आज दुपारच्या सुमारास आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशमन दल आग विझविण्यासाठी बंब घेऊन दाखल झाले. मात्र, रस्त्यावर अतिक्रमण करुन गर्दी केलेल्या फेरिवाल्यांमुळे आग विझवण्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र, अथक प्रयत्नांनतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, या प्रकारानंतर शहरात फेरीवाल्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे .

सविस्तर घटना…

अंबरनाथ रेल्वे स्थानकजवळ असलेल्या भगतसिंग नगर या झोपडपट्टीत आज दुपारी आग लागली होती. नगरपालिकेचे   अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले. यावेळी अग्निशमन दलाची गाडी  मुख्य रस्त्यावरुन आत जाण्यासाठी प्रयत्न करीत होती. मात्र, तेथील फेरीवाल्यांनी सर्व रस्ता व्यापल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन दल व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नव्हते. शेवटी आग लागलेल्या झोपडीपर्यंत पाण्याचा पाईप पोहचविण्यात आला आणि आग विझवली गेली. या घटनेमुळे फेरीवाल्यांच्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
गेल्या 8 वर्षांपासून मी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसीलदार आदी ठिकाणी फेरीवाल्यांच्या विरुद्ध  तक्रारी करीत आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई ठोस कारवाई झालेली नाही. याप्रकरणी मी लवकरच आंदोलन करणार आहे. – सिझर लॉरेन्स, स्थानिक समाजसेवक
फेरीवाल्यांना काही गुंड आणि राजकीय व्यक्ती पोसत आहेत. या संदर्भात मी स्वतः प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. फेरीवाल्यांमुळे आज मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. भविष्यकाळात यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष द्यावे. –  उपनागराध्यक्ष अब्दुल शेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -