घरमुंबईकाँग्रेस आघाडीत सामील होण्याचे आंबेडकरांचे मार्ग बंद झाल्यात जमा

काँग्रेस आघाडीत सामील होण्याचे आंबेडकरांचे मार्ग बंद झाल्यात जमा

Subscribe

प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला काँग्रेस आघाडीत येण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. आघाडीत यायचे असल्यास एमआयएमबरोबरील संबंध मोडावे लागतील, अशी अट आघाडीच्या प्रमुख दोन्ही काँग्रेस पक्षांनी आंबेडकरांवर टाकली आहे. मुस्लीम ताकदीचा औरंगाबादमध्ये अंदाज घेतलेल्या आंबेडकरांना ही अट मान्य नसल्याने आघाडीत येण्याचा भारिप बहुजन महासंघाचा मार्ग जवळपास बंद झाल्यात जमा आहे.

राज्यात निवडणुकांचे कार्यक्रम जसजसे जवळ येत आहेत तसतशी राजकीय पक्षांमधल्या गटतट आणि आघाडी, युतीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. आगामी निवडणुकीला एमआयएमसोबत सामोरे जाण्याचा निर्णय भारिप बहुजन महासंघाने घेतला आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयएम आणि भारिपचा मेळावा काही महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये आयोजण्यात आला होता. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या लोकांची संख्या आंबेडकर यांना भुरळ पाडत होती. उपस्थितांची संख्या पाहून आंबेडकरांनाही प्रचंड शक्तीच्या अपेक्षा वाढल्या; पण दुसरीकडे काँग्रेस आघाडीत येण्याचाही मार्ग आंबेडकर यांना खुला ठेवण्यात आला होता. मात्र आता आघाडीत यायचे असल्यास एमआयएमबरोबरची साथ सोडावी लागेल, अशी अटच आंबेडकरांवर घालण्यात आली आहे.

- Advertisement -

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एमआयएमची साथ सोडून देण्याची अट भारिप बहुजन महासंघावर टाकण्यात आली. ही अट टाकण्यामागे एमआयएमच्या नेत्यांकडून काँग्रेस पक्षावर करण्यात येत असलेल्या टीकेचे निमित्त केले जात आहे. भाजपवर आरोप करताना एमआयएमकडून काँग्रेसलाही टार्गेट केले जात असल्याचे दिसू लागल्याने त्या पक्षाला बरोबर घेऊन काँग्रेस आघाडीत सहभागी होता येणार नाही असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र ही अट आंबेडकर यांनी धुडकावून लावल्याचे सांगण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत एमआयएमला सोडणार नाही, असे आंबेडकर म्हणाले. यामुळे आघाडीत भारिप बहुजन महासंघाला सामील करून घेण्याचा विषय आता संपल्यात जमा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -