घरमुंबईअंबरनाथ,बदलापुरात निवासी संकुलाचा वाढतोय ओघ

अंबरनाथ,बदलापुरात निवासी संकुलाचा वाढतोय ओघ

Subscribe

येत्या काही वर्षांमध्ये अंबरनाथ, बदलापूर येथे महत्त्वपूर्ण बाजारपेठ बनू शकते. दुसरीकडे ज्यांची मुंबईत घरे असतात त्यांच्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर यासाठी दुसरे घर खरेदी करण्यासाठी अथवा गुंतवणूक करण्यासाठी या ठिकाणी ओढा सुरू झाला आहे. घर खरेदीदारांना आकर्षित करणारे महत्वाचे घटक कनेक्टिविटी, रोजगार संधी, प्रदूषण मुक्त वातावरण आणि अनुकूल बजेट, आरोग्य हे आहेत.

मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या आणि निवासी जागांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. गेल्या दशकात अंबरनाथ, बदलापूर ही शहरेही लहान व मध्यम उद्योगांसाठी नावारुपाला आली आहेत. त्याअनुषंगाणे या शहरांमध्ये रोजगार वाढीस लागला आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे या शहरांची प्रतिमा औद्योगिक केंद्रापासून ते निवासी केंद्रापर्यंत बदलली आहे. या शहरांमध्ये ठिकठिकाणी आता निवासी संकुलांचा ओघ वाढत आहे.

- Advertisement -

वाढत्या पायाभूत सुविधांसह, बांधकाम व्यावसायिक आणि विकासक आता निवासी क्षेत्रात अधिक गुंतवणूक करीत आहेत. त्यानुसार उपनगरे विकसित करण्यात आली आहेत, यात तांत्रिकदृष्ठ्या प्रगत रुग्णालये, अत्यंत अनुभवी डॉक्टर, शाळा आणि महाविद्यालये, मुलांसाठी उत्तम शैक्षणिक पर्याय, मॉल, रेस्टॉरंट्स आणि मल्टीप्लेक्ससारख्या सुविधांचा सामावेश करण्याकडेही विकासकांचा भर राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी राहण्यासाठी येणार्‍या लोकांचे केवळ राहणीमान आणि संस्कृती उंचावत नाही, तर अशा प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त गृहनिर्माण संकुलांमध्ये राहण्यासाठी येणार्‍यांच्या उत्तम जीवनशैलीसाठी तो मैलाचा दगड ठरत आहे.

आपण अंबरनाथ, बदलापूर याठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. नोकरीसाठी आणि उच्च शिक्षणासाठी स्थलांतर करणारे लोक याच ठिकाणी राहतात. अशा वेळी अन्य सेवासुविधांचा पर्याय हमखास पडताळला जातो.
येत्या काही वर्षांमध्ये अंबरनाथ, बदलापूर येथे महत्त्वपूर्ण बाजारपेठ बनू शकते. दुसरीकडे ज्यांची मुंबईत घरे असतात त्यांच्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर यासाठी दुसरे घर खरेदी करण्यासाठी अथवा गुंतवणूक करण्यासाठी या ठिकाणी ओढा सुरू झाला आहे. घर खरेदीदारांना आकर्षित करणारे महत्वाचे घटक कनेक्टिविटी, रोजगार संधी, प्रदूषण मुक्त वातावरण आणि अनुकूल बजेट, आरोग्य हे आहेत. हे सर्व घटक या ठिकाणी सकारात्मक असतात. या ठिकाणी आताही सरासरी 15 लाख ते 30 लाख रुपयांपर्यंत 1 बीएचके घर उत्तम सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या अपार्टमेंटमध्ये उपलब्ध होऊ शकते. म्हणूनच या भागातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये उत्साह वाढलेला आहे.

- Advertisement -

लक्झरी अपार्टमेंट सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीपैकी एक मानले जाते, परंतु विकासकांसाठी एक लक्झरी अपार्टमेंट विक्री करणे हे मोठे आव्हान असते. या ठिकाणी साधारणपणे प्रकल्प अंमलात आणण्यासाठी सुमारे दोन ते चार वर्षे लागतात. या कालावधीदरम्यान बांधकाम व्यावसायिक बहुतेक फ्लॅट्स विकण्याचा प्रयत्न करतात.

अंबरनाथ, बदलापूर हा भाग बांधकाम व्यावसायिक आणि खरेदीदार या दोघांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देणारा बनला आहे. स्वस्त घरे, चांगला परतावा, तसेच घरे विक्री होण्यासाठी उत्तम वातावरण याठिकाणी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी घेतलेल्या घराच्या बदल्यात दीर्घ कालावधीनंतर चांगला परतावा मिळण्याची शाश्वती आहे. या क्षेत्रात निर्माण होणार्‍या गृहप्रकल्पांना पंतप्रधान आवास योजनाही लागू आहे. पायाभूत सुविधांमुळे प्रगती होत आहे आणि रिअल इस्टेट उद्योग विकसित होत आहे, प्रकल्पासाठी वित्त, गृह कर्जे इत्यादी देखील सहज उपलब्ध होतात ज्यामुळे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत होते.

मालमत्तेच्या दृष्टीने जीएसटीच्या अंमलबजावणीसारख्या संरचनात्मक बदलांनंतर बाजारपेठेत सामान्य वाढ झाली आहे. आता रिअल इस्टेटमध्ये आत्मविश्वास परत येत आहे. परवडणार्‍या घरांच्या मागणीत कमालीची मागणी वाढली आहे. बाजारपेठेत मागणी वाढली आहे, तसा पुरवठाही सुरू झाला आहे.

विकासकांनीही आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करणे सुरू केले आहे. घर खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना जर चालू कन्स्ट्रशनमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असली, तरी त्यांचे भावी घर कसे असणार हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हुबेहुब दाखवण्याची लकब विकासकांनी आत्मसात केलेली आहे. गुंतवणूकदारांची भावना ही कायम लाइफ टाइम बचत अशीच असते.

भारतीय रिअल इस्टेट उद्योगात आता ‘व्हर्च्युअल रियालिटी’ ट्रेन्डचा वापर सुरू आहे. डेव्हलपर मार्केटिंगच्या अनेक पैलूंमध्ये व्यस्त असतात, त्यातून ग्राहकांना वेळ देणे शक्य होत नाही. अशा वेळी या ठिकाणी अनेक विकासक 3D , 4D किंवा ड्रोन शूट इत्यादींच्या सहाय्याने थेट साईटचे चित्रीकरण केलेले दाखवतात. हे तंत्रज्ञान डेव्हलपर्सच्या ऑफिसपर्यंत मर्यादित नाही, अगदी प्रदर्शनस्थळीदेखील थेट साइटवर घेऊन जाण्याचा आभास निर्माण केला जातो. अशा प्रकारे ग्राहकांना शक्य तेवढे तंतोतत दृश्यस्वरूपात सांभाव्य घर दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंतवणुकीसाठी येणार्‍या ग्राहकांच्या मनातील शक्य तितक्या सर्व प्रश्नांची उत्तरे हमखास दिली जातात. मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना यातून विश्वास प्राप्त होत आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -