घरमुंबईमुदत संपलेले इंजेक्शन दिले; १२ रुग्णांना रक्ताच्या उलट्या

मुदत संपलेले इंजेक्शन दिले; १२ रुग्णांना रक्ताच्या उलट्या

Subscribe

अंबरनाथ येथील डॉ. बी. सी. छाया रुग्णालयात थंडी आणि ताप या आजारांवर उपचार घेणाऱ्या १२ रुग्णांना मुदत संपलेले इंजेक्शन दिल्यामुळे रक्ताच्या उलट्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. त्यामुळे तातडीने रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांनी धाव घेतली. काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी दोन रुग्णांना उपचारासाठी मुंबईत पाठवण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

डॉ. बी. सी. छाया रुग्णालयात थंडी आणि तापामुळे आजारी असेलेल्या दहा ते बारा रुग्णांना सइपट्रेकझोन हे प्रतिजैविक इंजेक्शन देण्यात आले. या इंजेक्शनमुळे रुग्णांना अस्वस्थ वाटू लागले. थोड्या वेळाने या रुग्णांना रक्ताच्या उलट्या झाल्या. अचानक हा सर्व प्रकार घडल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही घाबरले. रुग्णांना तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात आले. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी इतर नातेवाईकांनाही बोलावले. मुदत संपलेले इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णांना त्रास झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

- Advertisement -

या सर्व घडामोडींनंतर पोलीसही रुग्णालयात आले. त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना शांतेतेचे आवाहन केले. पोलिसांनी रुग्णालयातील इंजेक्शनचा साठा जप्त केला. दरम्यान, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा वाळेकर देखील घटनास्थली दाखल झाल्या. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय याप्रकरणाबाबत अंबरनाथचे मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर याबाबत माहिती टाकली आहे आणि रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराबाबतही त्यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया हिंदुजा रुग्णालयात दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -