घरमुंबईमहावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात 'बत्ती गुल'; मनसेकडून कंदील भेट

महावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ‘बत्ती गुल’; मनसेकडून कंदील भेट

Subscribe

मागील काही दिवस अंबरनाथमधील वीजपुरवठा खंडित होत आहे. याची दखल घेत मनसेकडून महावितरणवर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

अंबरनाथमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील वीजपुरवठा खंडित करून तसेच त्यांना कंदील भेट देत अनोख्या पद्धतीने आंदोलन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अंबरनाथमध्ये सुरु असलेल्या विजेच्या लपंडावाकडे लक्ष वेधले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत जाब विचारला.

यापुढे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, तसेच नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे कुणाल भोईर यांनी सांगितले. यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अधिकाऱ्यांकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे

मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर सचिव अविनाश सुरसे आदींसह अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. अव्वाच्या सव्वा बिले येणे, वीज बिलावर मीटर रिडींगचा फोटो नसणे अशा तक्रारी असतानाच अंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी याबाबत विचारणा केल्यास त्यांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना काय त्रास होतो याची जाणीव करून देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील वीज पुरवठा खंडित करून व त्यांना कंदील भेट देऊन हे आंदोलन केले.
कुणाल भोईर, मनसे अंबरनाथ शहराध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -