घरताज्या घडामोडीअमित ठाकरेची राजकारणात एन्ट्री, मनसेच्या नेतेपदी निवड

अमित ठाकरेची राजकारणात एन्ट्री, मनसेच्या नेतेपदी निवड

Subscribe

अमित ठाकरे यांनी मनसेच्या व्यासपीठावर येत शिक्षणाचा ठरावा मांडला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज मनसेचे पहिले महाअधिवेशन पार पडत असून यावेळी अमित ठाकरे यांची देखील नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.

काय म्हणाले अमित ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी मला ठराव संदर्भात माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, २३ जानेवारी रोजी महाअधिवेशन होणार असून त्या अधिवेशनात शिक्षणाचा ठराव मांडला जाणार असल्याची माहिती दिली. ही माहिती ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तसेच याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे, तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. तसेच शाल आणि तलवार देऊन अमित ठाकरेंचा सत्कार करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मनसेचा नेता ठेवणार प्रत्येक नेत्यावर नजर, शॅडो कॅबिनेटची स्थापना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -