घरमनोरंजनमराठीला शिळ्या शुभेच्छा, बीग बी झाले ट्रोल

मराठीला शिळ्या शुभेच्छा, बीग बी झाले ट्रोल

Subscribe

बॉलिवूडच्या बिग बींनी मराठी दिनाच्या शुभेच्छा २७ फेब्रुवारी ऐवजी २८ फेब्रुवारीला दिल्याने ट्विटरवर आता ते ट्रोल होत असल्याचे दिसत आहे.

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो, गुरूवारी (२७ फेब्रुवारी) संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी दिन मोठ्या जल्लोषात पार पडला. मात्र, बॉलिवूडच्या बिग बींनी मराठी दिनाच्या शुभेच्छा २७ फेब्रुवारी ऐवजी २८ फेब्रुवारीला दिल्याने ट्विटरवर आता ते ट्रोल होत असल्याचे दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ओळी ट्विटरवर पोस्ट करत मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

- Advertisement -

ज्ञानेश्वरांच्या ओळी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

बिग बींनी ट्विटरवर संत ज्ञानेश्वरांच्या ओळी ट्विट केल्या आहेत. मात्र मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना एक दिवस उशीर झाल्याने ते ट्विटरवर ट्रोल होत आहेत. यावेळी बिग बींनी ट्विट करत लिहीले की, ‘मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ देत त्यांनी,

“माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। -संत ज्ञानेश्वर​.”

- Advertisement -

या ज्ञानेश्वराच्या ओळी त्यांनी ट्विट केल्या आहेत.

युजर्सने केले ट्रोल

अमिताभजींना मराठी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी उशीर झाल्याने ट्विटरवर अनेकांनी अमिताभजींच्या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘देर आये दुरुस्त आये’ मराठी दिवस काल होता आणि आज विज्ञानदिन आहे. असे एका युजरने रीट्विट करत अमितजींच्या पोस्टला कमेंट केली आहे. तर काहींनी ‘काल राजभाषा दिन होता आज नाही’, असे म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -