घरमुंबईमाझं भाषण मध्येच का थांबवलं? अमोल पालेकरांचा सवाल!

माझं भाषण मध्येच का थांबवलं? अमोल पालेकरांचा सवाल!

Subscribe

एनजीएमएमध्ये अमोल पालेकरांचं भाषण मध्येच थांबवल्यामुळे मोठा वाद सध्या सुरू असून त्यावर आता पालेकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईच्या एनजीएमएमध्ये चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रप्रदर्शनामध्ये अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते अमोल पालेकर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, यामध्ये आयोजकांनी अचानक भाषण करताना अमोल पालेकरांना थांबवलं. त्यांच्या भाषणातले मुद्द्ये कार्यक्रमाच्या औचित्याला धरून नव्हते असा आक्षेप आयोजकांनी घेतला होता. या मुद्द्यावर आता अमोल पालेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली असून ‘माझ्या भाषणातले मुद्दे औचित्याला धरूनच होते’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. यावेळी त्यांच्या पत्नी संध्या गोखले याही उपस्थित होत्या.

NGMAमध्ये NGMAबद्दलच बोलणार ना?

एनजीएमएमध्ये चित्रकार प्रभाकर बर्वे यांचं रेट्रोस्पेक्टिव्ह भरलं होतं. मला तिथे वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. माझ्या चालू भाषणात थांबवून अडथळे आणले गेले. त्यामुळे मला माझं भाषण थांबवावं लागलं. मला माझं भाषण पूर्ण करता आलं नाही. पण तुम्ही जेव्हा एखाद्या वक्त्याला आमंत्रित करता, तेव्हा त्याला आधी सांगायला हवं की काय बोलायचं नाही. पण तसं काही सांगितलंच नव्हतं. आयोजकांनी देखील हे मान्य केलं आहे. एनजीएमए संस्थेमध्ये झालेले बदल यावर मी बोलत होतो. त्यांनीच हे रेट्रोस्पेक्टिव्ह आयोजित केलं होतं. त्यामुळे त्या कार्यक्रमात एनजीएमएबद्दल बोलणं औचित्याला धरूनच होतं.

- Advertisement -

४ मजले एनजीएमएसाठीच राखीव का?

एनजीएमएमध्ये प्रभाकर बर्वेंचं कदाचित शेवटचं रेट्रोस्पेक्टिव्ह ठरले असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे जेव्हा आम्ही आधी माहिती घेतली, तेव्हा लक्षात आलं की एनजीएमएचे पाचही मजले वापरले जातील असं हे शेवटचं रेट्रोस्पेक्टिव्ह आहे. कारण तिथे नवीन आलेल्या डिरेक्टर्सनी ठरवलेल्या धोरणानुसार एनजीएमएच्याच कलेक्शनचं तिथल्या ४ मजल्यांवर दाखवलं जाईल. आणि फक्त पाचव्या मजल्यावर ज्याला डोम म्हणतात, तिथेच बाहेरच्या कलाकारांचं प्रदर्शन भरवलं जाईल असं ठरलं. हा माझ्यासाठी धक्का होता.


वाचा काय नेमकं म्हणाले पालेकर

पाचव्या मजल्यावर जागाच कमी

मेहली गो बाई आणि सुधीर पटवर्धन हे दोन्ही मुंबईकर पण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार यांचं एप्रिल २०१९मध्ये एनजीएमएने रेट्रोस्पेक्टिव्ह करण्याचं मान्य केलं होतं. पण जुन्या कमिटीची मुदच संपली. आणि नव्या कमिटीने फक्त प्रभाकर बर्वेंचं रेट्रोस्पेक्टिव्ह केलं आणि मेहली आणि पटवर्धन यांची रेट्रोस्पेक्टिव्ह रद्द करण्यात आलं. वरच्या पाचव्या अर्थात डोम असलेल्या मजल्यावर जागा अतिशय कमी आहे. त्यामुळे इतर कलाकारांना त्यांची नवी कला दाखवायची असेल, तर त्यासाठी फक्त तेवढीच जागा उपलब्ध असेल. आणि उरलेल्या ४ मजल्यांवर एनजीएमएचेच कलेक्शन दाखवले जाणार आहे.

- Advertisement -

माझं भाषण सेन्सॉर करून घ्यायचं का?

पण मग असं ४ मजले एनजीएमएसाठी राखीव ठेवण्याची गरज आत्ता का पडली? यासारख्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या भाषणात बोलायला सुरुवात केली होती. पण मला थांबवलं. डिरेक्टर अनिता रुपवर्धिनी यांनी मला थांबवलं. माझ्या भाषणानंतर त्या फार अपसेट झाल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की मी काय बोलणार हे त्यांना सांगायला हवं होतं. मी त्यांना म्हणालो, की मी काय बोलणार हे आता मी तुमच्याकडून सेन्सॉर करून घ्यायचं का? मुळात मी सेन्सॉर अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच बोलत होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -