घरमुंबईकेंद्र सरकारवर टीका करु नका; पालेकरांचं भाषण रोखलं

केंद्र सरकारवर टीका करु नका; पालेकरांचं भाषण रोखलं

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केंद्र सरकावर आरोप केल्यानं त्यांना आपले भाषण अर्ध्यावरचं सोडावे लागले आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईतल्या एका कार्यक्रमा दरम्यान वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. मुंबईत शनिवारी ‘नॅशलन गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट’ (एनजीएमए) च्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाकर बारवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स’ या विषयावर पालेकर बोलत होते. त्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यावेळी त्यांना केंद्र सरकारव टीका करुन नका, असे व्यासपीठावरील एका सदस्याकडून सांगण्यात आल्याने त्यांना आपले भाषण अर्ध्यावरच सोडावे लागले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा निर्णय चुकीचा

प्रभाकर बारवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘नॅशलन गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट’ (एनजीएमए) च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स’ या विषयावर बोलत होते. भाषणात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा एक निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यास सुरुवात केली. मात्र त्या दरम्यान व्यासपीठावर बसलेल्या एनजीएमएच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. या कार्यक्रमात केंद्र सरकारवर टीका करु नका, असे पालेकर यांना बजावण्यात आले. भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक रोखल्याने पालेकरांना राग आला. ते चांगलेच संतापले. या कार्यक्रमामध्ये पालेकरांना भाषण करताना बऱ्याच वेळा रोखल्याने त्यांनी आपले भाषण अर्ध्यावरचं थांबवले आणि ते खुर्चीत बसण्यासाठी निघून गेले. अमोल पालेकरांचा अर्धवट भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एखादी व्यक्ती भाषण करीत असताना त्या व्यक्तीला मध्येच भाषण करण्यापासून कुणी थांबवतं का? असा सवाल अमोल पालेकरांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

वाचा – ‘खान’ आडनावामुळेच आमिर, नसीर टार्गेट – अमोल पालेकर

वाचा – ‘चला, एकत्र येऊ या’ मेळाव्याला ज्येष्ठ लेखिका नयनतारांची उपस्थिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -