घरमुंबईमाकडाचा डीटीएच छत्रीवरच विकेंड सुरूय, पण तुम्ही कार जिंकू शकता !

माकडाचा डीटीएच छत्रीवरच विकेंड सुरूय, पण तुम्ही कार जिंकू शकता !

Subscribe

 

सीट टॉप बॉक्स ही संकल्पना कधी एकली आहे का ? होय एका माकडाला मिळालेली डीटीएच छत्रीवरची जागा बघूनच हे कॅप्शन एका फोटोला आले आहे. एका स्पर्धेच्या निमित्तानेच आनंद महिंद्रा यांच्या ट्विटरवरून व्हायरल झालेला हा फोटो सध्या अतिशय चर्चेत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मिडियावर फारच एक्टीव्ह असतात. त्यांच्या कॅप्शन कॉम्पिटीशनला नेहमीच तुफान प्रतिसाद मिळतो. यंदाही त्यांनी ट्विटरवर एका माकडाचा फोटो ट्विट करून त्यासाठी ट्विटर युजर्सकडून कॅप्शन लिहून मागितली आहे. या कॅप्शन कॉम्पिटिशनला ट्विटर युजर्सने मोठा प्रतिसाद दिला आहे. अवघ्या २४ तासांमध्ये जवळपास साडेपाच हजार लोकांनी या फोटोसाठी कॅप्शन दिले आहे. तर ३५ हजार लोकांनी या ट्विटला लाईक केले आहे. आज दुपारची डेडलाईन या फोटो कॅप्शनच्या स्पर्धेसाठी आनंद महिंद्रा यांनी दिली आहे.

सध्याच्या स्थितीत या फोटोपेक्षा दुसऱ्या कोणत्याही फोटोचा विचार कॅप्शन कॉम्पिटिशनसाठी करू शकत नाही. मी दोन विजेते निवडेने एक विजेता हिंदी कॅप्शनसाठी तर दुसरा विजेता हा इंग्रजी कॅप्शनसाठी निवडण्यात येईल. विजेत्याला महिंद्राचे कारचे मॉडेल गिफ्ट म्हणून मिळेल. डेडलाईन ठेवताना त्यांनी आज दुपारी २ वाजेपर्यंत यासाठी कॅप्शन मागविल्या आहेत. एक माकडाचा डीटीएचच्या छत्रीवर बसल्याचा फोटो आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.

काय आहे ट्विट

त्यांच्या ट्विटर कॉम्पिटिशनला अनेकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देतानाच मोठ्या प्रमाणात ट्विट केले आहे. त्यामध्ये काही जणांनी सध्याची परिस्थिती आणि राजकीय नेते यांच्या फोटोंसह ट्विट केले आहे. तर काही जणांनी अतिशय थोडक्या शब्दात या फोटोचे लॉजिकल असे वर्णन केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी याआधी केलेल्या ट्विटमध्ये म्हटल होत की जोवर सरकार शेवटच्या माणसासाठी आर्थिक आधार देणार नाही तोवर सामाजिक विषय सुटणार नाही. अन्यथा कोरोनाची महामारी संपल्यानंतर या सामाजिक विषयांमध्ये आणखी भर पडले असे आनंद महिंद्रा यांनी स्पष्ट केले होते. कॅनडा इंडिया बिझनेस काऊंसिलच्या इंडिया इनव्हेस्ट फोरम २०२० मध्ये त्यांनी शेवटच्या व्यक्तीसाठी आर्थिक तरतुद व्हायला हवी अशी मागणी केली होती. कोरोनाच्या संकटानंतर शेवटच्या व्यक्तीची आर्थिक सुधारणा व्हायला हवी असेही मत त्यांनी मांडले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -