घरमुंबईझोपू योजनेतून होणार आनंदनगरचे पुनर्वसन

झोपू योजनेतून होणार आनंदनगरचे पुनर्वसन

Subscribe

सुमारे 2280 झोपड्या असलेले आनंदनगर हे ठाण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेले नगर आहे. 42 हजार चौरसमीटर शासकीय जागेवर या झोपड्या आहेत. या परिसराचा विकास आता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी येथील 85 टक्के नागरिकांनी संमती दिली आहे. तसेच झोपडपट्टी धारकाच्या कुटूंबाची आणि त्याच्या घरांची माहिती नोंद करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. याशिवाय, प्राधिकरणाने या भागात बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे कामही पूर्ण केले आहे. त्यामुळे या परिसराचा लवकरच कायापालट होणार असल्याने येथील नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे.

ठाणे शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला. मुंबई शहरापर्यंत मर्यादित असलेल्या प्राधिकरणामध्ये ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश करण्यात आला. तसेच या विभागाचे स्वतंत्र कार्यालयही ठाणे शहरात सुरु करण्यात आले. यामार्फत शहरात झोपड्यांच्या पुनर्विकास प्रस्तावांना मान्यता दिली जात असून त्यामध्ये आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचाही समावेश करण्यात आला आहे. ठाणे शहरातील 1800 ते 1900 घरे असलेले झोपड्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील घरांची संख्या 2280 आहे.

- Advertisement -

त्यामुळे ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणुन ओळखली जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया उरकून विकासकाच्या माध्यमातून योजनेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या विविध विभागांकडून प्रस्तावाची तपासणी केली जाणार असून त्यानंतर या प्रस्तावास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी अवघ्या वर्षभरात सर्व प्रक्रिया उरकून योजनेसाठी प्रस्ताव सादर करणारा हा पहिलाच परिसर ठरला असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -