घरमुंबईमाय महानगरच्या बातमीचा इम्पॅक्ट; अंधेरीतील धोकादायक पादचारी पूल होणार दुरुस्त

माय महानगरच्या बातमीचा इम्पॅक्ट; अंधेरीतील धोकादायक पादचारी पूल होणार दुरुस्त

Subscribe

माय महानगरच्या बातमीचा इम्पॅक्ट पडला आहे. अंधेरी गोखले पूल दुर्घटनेनंतर अंधेरीतील आणखी एक पूल धोकादायक असल्याची बातमी माय महानगरने दिली होती. या बातमीनंतर रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. हा धोकादायक पूल दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने माय महानगरला दिली आहे.

अंधेरी- विलेपार्ले येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर आपलं महानगरने अंधेरीतील आणखी एक पादचारी पूल धोकादायक असल्याची बातमी सगळ्यात आधी दाखवली होती. अखेर या बातमीची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून, या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा आणि मेट्रो स्टेशनला लागूनच असलेला एकमेव पादचारी पुल धोकादायक असल्याने ६ ऑगस्ट ते ३ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या पादचारी पुलाचे काम रेल्वे प्रशासनामार्फत ९० दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पूर्वेकडून – पश्चिमेकडे जाण्यासाठी पुढील ३ महीने रेल्वेच्या पुलाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

७० वर्ष जुना पादचारी पूल

अंधेरी येथे पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा मेट्रो स्टेशनला लागूनच एक ७० वर्ष जुना पब्लिक ब्रिज आहे. हा ब्रिज सुरुवातीला रुंद होता. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात विक्रेते बसायचे. मात्र जेव्हा अंधेरी-घाटकोपर मेट्रोसेवा सुरू झाली तेव्हा हा रुंद असलेला ब्रिज अरुंद करण्यात आला. आणि हा फक्त लोकांसाठी खुला ठेवण्यात आला. मात्र हा ब्रिज सध्या धोकादायक अवस्थेत असल्याची बातमी आपलं महानगरने दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -