घरमुंबई...या कारणास्तव जोडप्याला नाकारली हॉटेलमध्ये रुम

…या कारणास्तव जोडप्याला नाकारली हॉटेलमध्ये रुम

Subscribe

हॉटेलमध्ये रुम बूक केल्यानंतर ओळखपत्र दाखविणे आवश्यक असते. ओळख पत्र नसल्यास हॉटेल व्यवस्थापक तुमहाला प्रवेश नाकारु शकतो. मात्र ओळखपत्र असतांना केवळ अविवाहीत असल्याच्या कारणाने अंधेरीतील एका हॉलेमध्ये एका जोडप्याला प्रवेश नाकारन्याची घटना घडली आहे.अंधेरीतील फॅब हॉटेलच्या पंचवटी रेसीडन्सीमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. भारतीय महिला तिच्या दक्षिण अमेरिकेतील प्रियकरासोबत हॉटेलमध्ये चेक इन करण्यास गेली असता, रिसेप्शन काऊंटरवर त्यांचे ओळखपत्र बघितल्यावर, हे दोघेही अविवाहित असल्याचे कळताच, त्यांना हॉटेल व्यवस्थापनाने रुम देण्यास नकार दिला.विशेष म्हणजे त्या दोघांनी एक महिना आधीच या हॉटेलची ऑनलाईन बुकिंग केली होती. तेव्हा त्यांना कुठल्याही नियमावलीचा सामना करावा लागला नव्हता आणि त्यांच्या नावे रुम बूकही झाली होती. मात्र ऐनवेळी जेव्हा ते हॉटेमध्ये पोहचले, तेव्हा मात्र त्यांना हॉटेल व्यवस्थापनांकडून रुम देण्यास नकार देण्यात आला. तसेच त्यांनी ऑनलाईन बुकिंग करतेवेळी भरलेले पैसे देखील, त्यांना परत करण्यात आले नाहित.
भारतीय महिला आणि तिच्या दक्षिण अमेरिकेतील प्रियकराने युकेमधील एका नामांकित कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी घेतली आहे. मुंबईत फिरण्याच्या उद्देशाने त्यांनी एक महिना आधीच, अंधेरीतील हॉचेलमध्ये बुकिंग केली होती. बुकिंग केलेल्या दिवशी जेव्हा दोघेही शनिवारी रात्री एयरपोर्ट वरुन डायरेक्ट टॅक्सीने हॉटेलमध्ये चेकइन करण्यासाठी पोहचले, तेव्हा ऐनवेळी हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना तोंडघशी पाडले.
यावर महिलेने आणि तिच्या प्रियकराने हॉटेल व्यवस्थापनांशी बराचवेळ वादही घातला.
मात्र हॉटेल व्यव्थापनेने त्यांचे काहीही ऐकूण घेतले नाही. सोबतच त्यांनी केलेले बुकिंग हे कॅन्सल झाले असे नोंद करुन, त्यांना त्याचे पैसेही परत केले नाहीत. त्या दोघांनी म्हटले की, आम्ही मुंबईला येण्यापूर्वी दिल्ली, जयपूर, उदयपूरला गेलो असता आम्हाला कुठल्याही हॉटेलात अश्या प्रकारच्या नियमावलीचा सामना करावा लागला नव्हता.
हॉटेलच्या प्रतिनिधी आणि कस्टमरकेयरची स्पष्टोक्ती-
महिलेच्या प्रियकराने हॉटेलच्या कस्टमर केयरशी ५० मिनीटे चर्चा केली. कस्टमर केयरनी म्हटले की, त्यांच्या वेबसाईटवरच या बद्दल स्पष्ट नियमावली देण्यात आली आहे. तसेच हॉटेलच्या प्रत्त्येक शाखेच्या वेबसाईटवर देखील या नियमावलींचा उल्लेख आहे.त्यामुळे कंपनीच्या नियमावली विरुद्ध ते त्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत.
ऐनवेळी उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे ग्राहकांची गैरसोय झाली आहे, तरी आम्ही त्यांना जमेल तसे मदत करण्याचा प्रयत्न करु असे फॅब हॉटेलच्या प्रवकत्याने म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -