घरताज्या घडामोडी'तर शिवसेनेची मर्यादा सुटणारच'

‘तर शिवसेनेची मर्यादा सुटणारच’

Subscribe

'देवासारख्या नेतृत्वावर कोणी टीका करत असेल तर सहन करणार नाही, असे केल्यास शिवसेनेची मर्यादा सुटणारच', अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचे समर्थन केले आहे'.

‘देवासारख्या नेतृत्वावर कोणी टीका करत असेल तर सहन करणार नाही. रागाने मारले तर का मारले ते आधी बघा. अधिकाऱ्यांनी देखील आपल्या मर्यादा ओलांडू नये. त्यांनी देखील आपल्या मर्यादेत राहायला हवं. आमच्या नेतृत्वाचा अपमान करायचा मग त्यावर कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त केला ती गुंडगिरी कशी होते? कारण नसताना खंडणीसाठी मारहाण केलीय का? त्याने जे कार्टून फॉर्वर्ड केले त्यावर कार्यकर्त्यांचा संताप होता. अधिकाऱ्यांनी आपली मर्यादा सोडली मग कार्यकर्त्यांनीही आपली मर्यादा सोडली अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचे समर्थन केले आहे’.

काय म्हणाले अनिल परब?

नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरें संदर्भातील एक व्यंगचित्र व्हॉट्स Appवरुन फॉरवर्ड केले होते. त्यावरुन शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली होती. यावर आता अनिल परब यांनी मारहाण करणाऱ्यांचे समर्थन केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘मुन्ना यादव ज्याला माजी मुख्यमंत्री घेऊन फिरत होता, तो कोण होता? शिवसेना ज्वलंत सेना आहे. सेनेला धगधगता इतिहास आहे. सत्तेत बसलो म्हणून कुणीही टपली मारायची नाही. त्याचप्रमाणे खालच्या भाषेत टीका देखील करायची नाही. आम्ही सत्तेत बसलो म्हणून काहीही करणार का तुम्ही आणि आम्ही केवळ हाताची घडी घालून बसायचे का? कायदेशीर कारवाई केली तर सत्तेचा दुरुपयोग केला आणि मारलं तर सरकारचा दुरुपयोग केला जातोय असा आरोप करायचा का? टीका करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. कुणीही मर्यादा सोडली तर शिवसैनिक मर्यादा सोडणारच’, असे त्यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

पंतप्रधान घराच्या बाहेर कधी पडले?

विरोधकांकडून आरोप केला जात आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाही. मग, पंतप्रधान घराच्या बाहेर कधी पडले आहेत? कोणत्या राज्यात फिरले आहेत. प्रमुख पदावरील व्यक्ती अधिकाऱ्यांशी बोलत असतात. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सगळ्या जिल्ह्यातील ज्याठिकाणी पोहचता येत नाही तेथील समस्या सोडवता येतात. ज्या व्यक्तीला काम करायचे त्याने कुठूनही काम केले तरी जमते. जर इतकेच होते तर मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना पंतप्रधाना नरेंद्र मोदींनी मुंबईत यायचे होते, असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे.


हेही वाचा – ५०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त एसटी कर्मचारी हक्काच्या पैशांपासून वंचित

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -