घरमुंबईदुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी करा - अनिसचे आवाहन

दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी करा – अनिसचे आवाहन

Subscribe

दुर्घटना टाळण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव प्राध्यापक गणेश शेलार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना केले आहे.

नागरीकांनी पर्यावरणपूरक होळी आणि रंगपंचमी साजरी करावी यासाठी भिवंडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रबोधन करण्यात आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव प्राध्यापक गणेश शेलार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दुर्घटना टाळण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ या अनिसच्या उपक्रमाची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.

असा असतो उपक्रम

कोनगांव विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा परिषद शाळा सरवली सोनाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून एक उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रमात ‘पोळी होळीत टाकण्याऐवजी त्या गरिबांना दिल्या तर त्यांचाही सण गोड होईल’, असा हा उपक्रम आहे.

- Advertisement -

महिला पोळ्या दान करतात. अंनिस कार्यकर्ते त्या जमा झालेल्या पोळ्या विटभट्टीवर काम करणारे मजूर, फूट पाथवर राहणारे निराधार लोकांना आणि भिक्षूकांना त्याच दिवशी वाटल्या जातात. त्याचप्रमाणे पर्यावरण पूरक रंगपंचमी कशी साजरी करावी याबाबत माहिती देखील सांगितली आहे. त्याचप्रमाणे रासायनिक रंग वापरल्यामुळे त्वचा, डोळे यासाठी हानिकारक ठरतात म्हणून त्यामुळे नैसगिक रंगाचा वापर करा, असे आवाहन केले आहे.

असे तयार करा नैसर्गिक रंग

दरम्यान, नैसर्गिक जल रंग आणि कोरडे रंग कसे बनवायचे त्याची देखील माहिती यावेळी देण्यात आली आहे. हळद आणि मैद्यापासून पिवळा रंग, बिट या फळापासून लाल रंग, पालक किंवा कडुलींबाच्या पानांपासून हिरवा रंग बनवता येऊ शकतो. तसेच पळस, झेंडूची फुले, जास्वंद या फुलांपासून हि नैसर्गिक रंग कसे बनवायचे याबद्दल प्राध्यापक शेलार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. यावेळी शाळेतील शिक्षक नम्रता पातकर, विलास गायक, राजेश कराळे, निलिमा पाटील, पुष्पावती भोईर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

वाचा – एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची… सोशल माध्यमातून नागरिकांना आवाहन

वाचा – अभिषेक बच्चनमुळे ‘हा’ अभिनेता होळीला घाबरतो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -