‘राज ठाकरे चौकशीला जाताहेत की सत्यानारायणाच्या पूजेला?’

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

Mumbai
raj thakarye and anjali damania
राज ठाकरे आणि अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. आज, गुरुवारी राज ठाकरे ईडीने बजावलेल्या नोटिसीनंतर फोर्ट येथील ईडी कार्यालयात हजेरी लावणार असून त्याकरता ते दादर येथील कृष्णकुंज या निवासस्थानातून रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब म्हणजेच पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी ईडी कार्यालयासाठी निघाले. याच मुद्यावर अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. या संबंधीचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे.

काय आहे ट्विटर पोस्ट 

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?, अशी खिल्ली अंजली दमानिया यांनी उडवली आहे. तर बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.