घरमुंबईमालाड येथून अन्य एका बोगस डॉक्टरला अटक

मालाड येथून अन्य एका बोगस डॉक्टरला अटक

Subscribe

मालाड येथून अन्य एका बोगस डॉक्टरला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आमीर जाफर शेख असे या 37 वर्षीय बोगस डॉक्टरचे नाव असून अटकेनंतर त्याला दिडोंशी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आमीर हा मालाड येथील मालवणीतील गेट क्रमांक पाच, प्लॉट क्रमांक तेरामध्ये राहतो.

त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नव्हती. तरीही तो परिसरात आयुवैदिक डॉक्टर म्हणून वावरत होता. गुप्तरोग पूर्णपणे बरे करण्याच्या नावाखाली त्याने मालाड येथील दिडोंशी परिसरात एक क्लिनिक सुरु केले होते. तिथे येणार्‍या रुग्णांवर उपचार करुन त्यांच्याकडून मोठी रक्कम वसुल करीत होता. हा प्रकार गुन्हे शाखेला एका खबर्‍याकडून समजताच पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट बाराच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी मालाड येथील त्याच्या क्लिनिकमधून आमीर शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नव्हती. तरीही तो अनेकांना गुप्तरोगावर उपचार करण्याचे आमिष दाखवून त्यांना बोगस औषधे दिली. त्यांच्याकडून मोठी फी घेतली होती.

- Advertisement -

त्याच्या क्लिनिकमधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस औषधांचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध 419, 420 भादवी सहकलम 33, 36 महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी दिडोंशी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -