घरताज्या घडामोडीTRP Scam: रिपब्लिकच्या अडचणीत वाढ; ११ आरोपी अटकेत तर ६ चॅनेलची नावं...

TRP Scam: रिपब्लिकच्या अडचणीत वाढ; ११ आरोपी अटकेत तर ६ चॅनेलची नावं समोर

Subscribe

मुंबई पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्यावर आपली पकड आणखी मजबूत केली आहे. आज या घोटाळ्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. आज अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष चौधरी (वय ५०) असून त्याला मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ठाणे येथून अटक केली. अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले असता आरोपीला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौधरीच्या चौकशीतून Wow आणि न्यूज नेशन या चॅनेलची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या घोटाळ्यात सामील असलेल्या चॅनेलची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.

आशिष चौधरी हा क्रिष्टल ब्रॉडकास्ट या कंपनीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याची पत्नी शर्मिष्ठा ही याच कंपनीची डायरेक्टर आहे. चौधरीची कंपनी केबल चॅनेल वितरण करण्याचा व्यवसाय करते. टीआरपी घोटाळ्यात जो दहावा आरोपी म्हणून अभिषेक कोवडेला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून आशिष चौधरीचे नाव समोर आले होते. अभिषेक कोवडे हा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बॅरोमीटर लावलेल्या घरांमध्ये पैसे वाटण्याचे काम करत होता.

- Advertisement -

आशिष चौधरीच्या अटकेनंतर आणखी एका चॅनेलचे नाव टीआरपी घोटाळ्यात समोर आले आहे. Wow हे म्युजिक चॅनेल असून या चॅनेलतर्फे टीआरपीच्या आकड्यात फेरफार करण्यासाठी आपल्याला पैसे मिळत असल्याचे चौधरीने तपासादरम्यान सांगितले. एकूण तीन चॅनेलची नावे चौधरीने CIU (Crime Intelligence Unit) अधिकाऱ्यांना सांगितले. २०१७ पासून ते जुलै २०२० पर्यंत चौधरीला न्यूज नेशन, रिपब्लिक भारत आणि Wow चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठी पैसे मिळाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना अभिषेक आणि आशिष यांच्या दरम्यान व्यवहार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.

आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात ४६ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अभिषेक कोलवडेची कंपनी मॅक्स मीडिया आणि आशिष चौधरीची कंपनी क्रिष्टल ब्रॉडकास्ट यांच्यात आर्थिक व्यवहार आढळून आले आहेत. याआधी बॉक्स सिनेमा, फक्त मराठी आणि महा मुव्ही या चॅनेलची नावे या घोटाळ्यात समोर आली होती. त्याप्रमाणे या चॅनेलची चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -