घरमुंबईCorona: मुंबई पोलीस दलात कोरोनाने घेतला बारावा बळी; राज्यात १९ जणांचा मृत्यू

Corona: मुंबई पोलीस दलात कोरोनाने घेतला बारावा बळी; राज्यात १९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील मृत पोलिसांची संख्या १९ वर पोहोचली असून १ हजार ८०९ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला

महाराष्ट्रातील पोलीस दलावर असणारे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनाने बळी घेतला आहे. मुंबई दलातील हा १२ वा बळी असून राज्यात पोलिसांच्या मृत्यूची संख्या १९ वर पोहोचली आहे. वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेले ५७ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचे सोमवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. राज्यात आतापर्यंत एकूण १ हजार ८०९ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

वाहतूक शाखेत शिक्षण विभागात नेमणुकीला असलेले पोलिस कॉन्स्टेबल वरळी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. राज्यात आतापर्यंत १ हजार ८०९ पोलिसांना कोरोनची लागण झाली असून यामध्ये १९४ अधिकारी आणि १ हजार ६१५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ६७८ पोलिस बरे होऊन घरी परतले असून १ हजार ११३ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

दरम्यान, यापुर्वी सोमवारी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा कर्मचारी मालेगाव येथून बंदोबस्त आटोपून घरी परतला होते. संबंधित पोलिसाचे यापूर्वीचे सर्व स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले होते मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.


वडाळा पोलीस ठाण्यातील शिपायाचा नाशिकमध्ये मृत्यू!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -