घरCORONA UPDATECoronaVirus : आणखी एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

CoronaVirus : आणखी एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Subscribe

महापालिकेच्या सी विभागातील सुरक्षा रक्षकाचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या युध्दात सुरक्षेची प्रमुख जबाबदारी पार पाडणाऱ्या महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या आणखी एक जवानाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. महापालिकेच्या सी विभागातील सुरक्षा रक्षकाचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी केईएम रुग्णालयातील मुख्य सुरक्षा रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सुरक्षा रक्षकाची संख्या दोन वर पोहोचली आहे.

महापालिकेच्या सुरक्षा विभागातील जवानांना कस्तुरबा, इएनटी तसेच अन्य रुग्णालयांमध्ये सेवेसाठी तैनात करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना याची बाधा झाली आहे. महापालिका मुख्यालयातच १८ ते २० जवानांना बाधा झाली. पण आतापर्यंत सुरक्षा ८५ जवान आणि ६ अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील बहुतांशी जवान बरे होवून घरी परतले आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील मुख्य सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर, शुक्रवारी महापालिकेच्या सी विभागातील सुरक्षा रक्षकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांच्या सहकारी जवानांनीही चाचणी करून घेतली आहे. काहींचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा खात्याप्रमाणेच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचेही मृत्यू होत आहे. आतापर्यंत या विभागाचे ५० च्या आसपास जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ६ अग्निशमन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुरक्षा खात्यापाठोपाठ अग्निशमन दलाचे जवानही मोठ्याप्रमाणात बाधित होताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -