घरमुंबईठाण्यात डेंग्यूचा आणखी एक बळी

ठाण्यात डेंग्यूचा आणखी एक बळी

Subscribe

ज्युपिटर रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या आजारावर उपचार घेण्राया भिवंडी येथील 14 वर्षीय जिया पाटील हीचा योग्य उपचाराअभावी आणि डॉक्टराच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप पाटील कुटुंबियांनी केला आहे. डेंगूच्या आजाराने त्रस्त असलेल्या भिवंडी येथील जिया पाटीलला दिनांक 23 सप्टेंबर रोजी ठाण्याच्या ज्युपिटर या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी भरती होण्याकरता डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांकडे अगोदर पैसे भरा, नंतर तुमच्या रुग्णाला भरती करतो, असे सांगितले. यावेळी जिया पाटील यांच्या कुटुंबियांनी 1 लाख रुपये भरुन तिला रुग्णालयात दाखल केले. जिया हिच्यावर 5 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. डेंग्यूचा आजार असल्याने प्रत्येकवेळी शरीराची चाचणी करावयास लागत होती. मात्र, अगोदर पैसे भरा, नंतर चाचणी करतो असे वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. तसेच तुमची मुलगी उत्तम प्रतिसाद देत आहे, असेदेखील सांगण्यात येत होते. परंतु रुग्णाला भेटण्यासाठी पाठवत नव्हते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

- Advertisement -

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी विविध स्वरुपाचे प्रयत्न केले जात असतानाच मागील दोन महिन्यात डेंग्युच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी रुग्णालयातून होत असलेल्या उपचारावर अविश्वास दर्शवून शहरातील अनेक नागरिक मोठ-मोठ्या रुग्णालयात धाव घेत आहेत. याचा फायदा घेत शहरातील ही बडी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बील आकारत असल्याची तक्रार अनेक नागरिक करीत आहेत. मात्र बिलाची रक्कम भरूनही रुग्ण मृत्युमुखी पडत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे.

सप्टेंबर 23, 2018 रोजी पेशंटला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गंभीर डेंग्यूमुळे हेमिरगिक शॉक सिंड्रोम झाले होते. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये येण्याआधी दोन अन्य रुग्णालयांनी प्रकरण गंभीर आहे म्हणून भरती करण्यास असमर्थता दर्शविली होती. ती कमी रक्तदाब आणि खूप कमकुवत पल्ससह आली. तिचे यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाले होते. ज्युपिटरला आणण्यापूर्वी तिला प्लेटलेट ट्रान्सफ्यूजन मिळाले होते.

- Advertisement -

तिला उपचारांसाठी बालचिकित्सा इन्टेंसिव्ह केअर युनिट (पीआयसीयू) मध्ये दाखल करण्यात आले. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि सर्व आवश्यक उपचार दिले गेले. मूत्रपिंडाचे त्रास झाल्यामुळे तिला डायलिसिस देखील द्यावा लागला. परंतु चांगल्या प्रयत्नांनंतरही तिच्या स्थितीत सुधारणा होऊ शकली नाहीत. रुग्णाच्या गंभीर अवस्थेबद्दल आणि तिच्या कुटुंबाला वारंवार माहिती देण्यात आली. आम्ही रुग्णांच्या स्थितीवर दररोज कुटुंबातील नातेवाईकांना सल्ला देत होतो, जे एक प्रक्रिया म्हणून सर्व गंभीर आजारी रुग्णांसाठी केले जाते. –
जान्हवी बेलारे, जनसंपर्क विभाग, जुपिटर रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -