घरमुंबईमुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना उत्तर द्या आणि कमवा पैसे

मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना उत्तर द्या आणि कमवा पैसे

Subscribe

विरोधकांच्या टीकेला फेसबुक आणि ट्विटरवर सडेतोड उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमने सध्या १० ते १५ हजार रुपयांच्या पगारावर नवखी मुलं नेमली आहेत.

एखाद्या व्यक्तीबद्दल फेसबुकवर चांगले लिहायचे आणि त्यांच्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे. यासाठी तुम्हाला कुणी पैसै देत असेल तर.. आणि तेही थोडे थोडके नव्हे तर या कामाचे तुम्हाला १० ते १५ हजार मिळत असतील तर.. थोडं आश्चर्य वाटत असेल ना? तुमच्या मनात असाही प्रश्न आला असेल ना काय तरीच काय राव? पण सध्या असेही पैसे कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  तेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या वॉर रूममधून.. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय?  अहो त्याचे कारणही तसेच आहे.

कमवा १० ते १५ हजार रुपये

सध्या आगमी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून, प्रत्येक पक्ष आता प्रचाराच्या दिशेने कामाला लागला आहे. एकीकडे जरी युतीची बोलणी सुरू असली तरी भाजपाची सोशल टीम मात्र आतापासूनच विरोधकांवर सोशल मीडियातून टीका करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सोशल मीडिया टीम यामध्ये अग्र स्थानावर आहे.  विरोधकांच्या टीकेला फेसबुक आणि ट्विटरवर सडेतोड उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमने सध्या १० ते १५ हजार रुपयांच्या पगारावर नवखी मुलं नेमली असून, ही मुलं सध्या फक्त फेसबुक आणि ट्विटर येणाऱ्या अपडेवर नजर ठेवून त्यांना उत्तर देण्याचे काम करत असल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे.

- Advertisement -

आमदार मंगल प्रभात लोढांचे टीमवर लक्ष

सध्या मुख्यमंत्र्यांची ही वॉर रुम जोरदार कामाला लागली असून, आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपाची ही सोशल टीम विरोधकांच्या प्रत्येक टीकेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या सोशल टीमवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा हे बारकाईनं लक्ष देत आहेत. विशेष म्हणजे जवळपास ४० जणांची टीम ही मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया सांभाळण्याचे काम करत आहे.

वॉर रुममध्ये टीमला नेमूण दिलेली कामे पुढीलप्रमाणे

–  विरोधकांच्या प्रत्येक टिकेवर लक्ष ठेऊन विरोधकांना कमेंट करण्यासाठी वेगळी टीम

- Advertisement -

– फेसबुक पेजवर मुख्यमंत्र्यांचे भाषणातील महत्वाचे व्हडिओ अपलोड करण्यासा वेगळी टीम

– ग्राफिक्स बनवण्यासाठी वेगळी टीम

–  राज्यातल्या घडामोडींची माहिती संकलंन करण्यासाठी वेगळी टीम

– मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी वेगळी टीम

विविध कामांसाठी  वेगळवेगळे मानधन

विशेष म्हणजे या संपूर्ण वॉर रुममध्ये विविध कामासाठी वेगवेगळे मानधन देण्यात आले आहे. त्यामध्ये फक्त फेसबुकवर कमेंट देण्यासाठी १० ते १५ हजार पगार दिला जातो. त्यानंतर इतर विभागाचे काम बघणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या अनुभवानुसार पगार दिला जात आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण टीमवर नजर ठेवण्यासाठी वरिष्ठ पदावर देखील नियुक्ती करण्यात आली आहे. जी व्यक्ती सर्व कामाची रुपरेषा ठरवून, प्रत्येकाला काम वाटून देत आहे.

प्रत्येक मंत्र्यांची वेगळी सोशल टीम

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगळी सोशल टीम आहे. तशीच भाजपाच्या इतर मंत्र्यांची देखील स्वतःची अशी वेगवेगळी सोशल टीम सध्या काम करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेकांना नोकरीची संधी निर्माण झालीय असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -