घरमुंबईभिवंडीत ३८ पूरग्रस्त कुटुंबियांना अनुलोमची मदत

भिवंडीत ३८ पूरग्रस्त कुटुंबियांना अनुलोमची मदत

Subscribe

भिवंडी तालुक्यातील भादाणे या गावातील ३८ पुरग्रस्त कुटुंबियांना अनुलोम संस्थेच्या जनसेवक आणि वस्तिमित्र आदींनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकण आलेल्या महापुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली आहे. या पावसाचा फटका मुंबईत देखील बऱ्याच ठिकाणी बसला होता. मुंबईतील भिवंडीमधील काही सखल भागात पाणी भरल्यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांचे संसार उद्वस्त झाले होते. सध्या पुराची पातळी ओसरली असली तरी अनेकांचे उध्वस्त झालेले संसार उभे राहण्यासाठी वेळ लागणार आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील भादाणे या गावातील ३८ कुटुंबांना या पुराचा फटका बसला आहे. या पुरग्रस्त कुटुंबियांना अनुलोम संस्थेच्या जनसेवक आणि वस्तिमित्र आदींनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.


हेही वाचा – पूरग्रस्तांसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे मदतीचा हात

- Advertisement -


भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील भादाणे या गावातील ३८ पुरग्रस्त कुटुंबियांना अनुलोम संस्थेच्या जनसेवक आणि वस्तिमित्र आदींनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे
. हातावर पोट असणारे रोज मासेमारी करून आपला चरितार्थ चालवणाऱ्या आदिवासी बांधवाना गेल्या महिन्यात झालेला पुराचा मोठा फटका बसला होता. दोन दिवस येथील सर्व घरे पाण्यात बुडाली होती. त्याच पाण्यात घरातील सर्व वस्तू , धान्य वाहून गेले होते. या घटनेची माहिती प्रत्यक्ष जागेवर जाऊन अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि तेथील गरज लक्षात घेता धान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि कपडे, पिण्याचे पाणी आशा प्रकारे मदत करण्यात आली आहे. यावेळी अनुलोमचे जनसेवक राजेश पाठारे, माधव तिफणवर ,प्रकाश लसणे तसेच वस्ती मित्र जितेंन म्हात्रे,राजस,ओजस जयवंत आदी उपस्थित होते. सदर मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र नाईक यांनी विशेष हातभार लावला आणि शशीकांत भोईर , विजय कदम, प्रवीण राय ,शितल पाठारे यांचेही सहकार्य केले आहे.


हेही वाचा – मदत पूरग्रस्तांना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -