घरमुंबईमध्य रेल्वेचा प्रवाशांशी दुजाभाव

मध्य रेल्वेचा प्रवाशांशी दुजाभाव

Subscribe

मात्र रेल्वेकडून पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या अपघातग्रस्त प्रवाशांबाबत दुजाभाव केला जात आहे. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड ते डहाणूदरम्यान अपघात झालेल्या प्रवाशांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. तर मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत-कसारा दरम्यान अपघात झालेल्या प्रवाशांना सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये अपघात रोजचेच आहेत. मात्र रेल्वेकडून पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या अपघातग्रस्त प्रवाशांबाबत दुजाभाव केला जात आहे. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड ते डहाणूदरम्यान अपघात झालेल्या प्रवाशांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. तर मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत-कसारा दरम्यान अपघात झालेल्या प्रवाशांना सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते. मीरा रोड ते डहाणूपर्यंत अपघात झाल्यास प्रवाशांना उपचार मिळावेत म्हणून खासगी हॉस्पीटल्सशी पश्चिम रेल्वेने करार केला आहे. त्यानुसार २०१४ ते २०१७ मध्ये मीरा रोड ते डहाणू दरम्यान झालेल्या अपघातात ८२२ प्रवाशांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या जखमींच्या उपचारासाठी पश्चिम रेल्वेने तब्बल २ कोटी ६४ लाख ८७ हजार ४४७ रुपये इतका खर्च केला, अशी माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे.

पश्चिम रेल्वेमध्ये अपघात होताच खासगी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचार वेळेत मिळत असल्याने अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे. तर मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा दरम्यान अपघात झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते. मात्र सरकारी हॉस्पीटलमधील इतर पेशंट्सची गर्दी, ताण आणि अपुर्‍या सोयीसुविधांच्या स्थितीमुळे अपघात झालेल्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. वर्ष २०१७ मध्ये झालेल्या विविध अपघातांमध्ये पश्चिम रेल्वेवर एक हजार ५४० जण जखमी झाले. तर मध्य रेल्वेवर एक हजार ८०५ प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवर विविध अपघातांमध्ये जखमी होणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वे जखमी प्रवाशांना सरकारी रुग्णालयात दाखल करते. त्यामुळे त्यांना तिथे वेळेवर उपचार मिळतील की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्ता समीर झवेरी यांनी सांगितले. २०१७ मध्ये मध्य रेल्वेवर अपघात १५३४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची संख्या एक हजार ४३५ आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर मध्य रेल्वेनेसुद्धा कल्याण पासून -कर्जत कसारा पर्यतच्या प्रवाशांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

पश्चिम रेल्वेने खासगी हॉस्पिटलसोबत करार करून प्रवाशांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेनेही खासगी हॉस्पिटलसोबत करार करून जखमी प्रवाशांना उत्तम सुविधा द्याव्यात. जेणेकरून प्रवाशांना वेळेत उपचार मिळू शकतील.
– समीर झवेरी, माहिती अधिकारी कार्यकर्ता

- Advertisement -

अपघातानंतर प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पश्चिम रेल्वेकडून बोरिवली ते विरार दरम्यान खासगी हॉस्पिटलशी करार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेत उपचार मिळत असल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत होते.
– नितीन कुमार डेविड, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

अपघातानंतर जखमी प्रवाशाची अवस्था पाहून त्याला गोल्डन अवरमध्ये जीआरपी पोलिसांकडून हॉस्पिटल मध्ये दाखल केले जाते. सोबतच जखमी प्रवाशांची अवस्था एकदम गंभीर असेल तर त्यास जीआरपी पोलीस कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे याचा निर्णय घेतात.

ए. के. जैन वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी , मध्य रेल्वे

जानेवारी – डिसेंबर २०१७

हार्बर रेल्वे
मृत्यू – ३९४
जखमी – ३७०
एकूण – ७६४

मध्य रेल्वे
मृत्यू – १५३४
जखमी – १४३५
एकूण -२९६९

पश्चिम रेल्वे
मृत्यू – १०८६
जखमी – १५४०
एकूण -२६२६


-नितीन बिनेकर

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -