सशस्त्र टोळीचा कुटुंबावर हल्ला, घरातील सामानांची तोडफोड

अंबरनाथ येथे दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या इसमाला हटकले असता. त्या गोष्टीचा राग आल्याने त्या हटकणाऱ्या इसमाच्या कुटुंबातील लोकांवर ७ ते ८ जणांच्या टोळीने सशस्त्र हल्ला केला आहे.

Mumbai
फसवणूक

दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या इसमाला हटकले या गोष्टीचा राग आल्याने त्या हटकणाऱ्या इसमाच्या कुटुंबातील लोकांवर ७ ते ८ जणांच्या टोळीने सशस्त्र हल्ला केला आहे. या टोळीने घरातील सामानांची देखील तोडफोड केली असून या हल्ल्यात ५ महिन्यांच्या चिमुकलीसह अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारिची दखल घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुटुंबावर केला हल्ला

अंबरनाथ (प) येथील बारकूपाडा रिलायन्स रिक्षा स्टँडजवळ श्रीराम हिरालाल भारती (४६) हा इसम त्याच्या कुटुंबासह राहतो. त्यांच्या घरी १४ एप्रिल रोजी सत्यनारायणची पूजा होती. त्यादिवशी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घराजवळ एक व्यक्ती दारू पिऊन मोबाईल फोनवर बोलतांना आरडाओरडा करून कोणालातरी शिवीगाळ करीत होता. त्याच्या आवाजामुळे श्रीरामच्या घरातील पाहुण्यांना त्रास होत होता. त्यामुळे श्रीराम यांचा मुलगा सुमित भारती याने त्या इसमाला सांगितले की आमच्या घरात पूजा आहे तेव्हा आरडाओरड करू नका. सुमितच्या बोलण्याचा त्या व्यक्तीला राग आला, आणि काही वेळात आरोपी विक्रम वाघे (२१), सागर धोडगे (१९), गुरुनाथ जंगल्या वाघे (२२), यशवंत वसंत वाघे (32) आणि अन्य ४ जणांसह भारती यांच्या घरात लाठ्याकाठ्या आणि धारदार शस्त्रासह घुसले.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

या आरोपींनी घरातील समानाची तोडफोड करून श्रीराम यांचे जावई निखिलेश रामकुमार परबत (२६) यांच्या दोन्ही पायांवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर श्रीराम यांचा मुलगा सुमित भारती (१९) याच्या डोक्यावर दगडांनी मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. या अमानुष मारहाणी नंतर घरातील इतर लोकांमध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, आरोपींनी कसलीही पर्वा न करता अमित भारती, त्याची पत्नी सौरंजु भारती, आई, बहीण, पाहुणी निकिता सच्चितानंद गिरी (१४) यांना देखील निर्दयपणे मारहाण केली, यावेळी आरोपींनी अमितच्या ५ महिन्यांच्या मुलीला सुद्धा जोरात ढकलून दिले, त्यामुळे ती देखील जखमी झाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विक्रम वाघे, सागर धोडगे, गुरुनाथ जंगल्या वाघे, यशवंत वसंत वाघे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here