घरमुंबईस्वयंसेवकांच्या सहाय्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त

स्वयंसेवकांच्या सहाय्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त

Subscribe

दरवर्षी ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपरातून भीम अनुयायी चैत्यभुमीवर जमत असतात. त्यानुसार गुरुवारी दादरच्या चैत्यभुमीवर जमलेल्या लाखो भीम अनुयायांच्या सुरक्षेसाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली होती. पोलिसांबरोबच या सगळ्या कामात अनेक स्वयंसेवी संस्था, एनसीसीचे विद्यार्थी झटत होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क आणि चैत्यभुमी परिसरात अनुयायांनी गर्दी केली होती. लहानमुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण या ठिकाणी जमले होते. या ठिकाणी बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. जवळपास ३ हजार पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. वृद्ध आणि चिमुरड्यांना गर्दीतून सुखरुपपणे बाहेर पडता यावे यासाठी पोलीस आणि स्वयंसेवक काम करत होते. अनेक महाविद्यालयांचे तरुणसुद्धा स्वेच्छेने गर्दीच्या व्यवस्थापनासाठी झटताना पाहायला मिळत होते.

- Advertisement -

रेल्वे पोलिसांकडूनही सहकार्य
मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांकडून १५६ कर्मचारी आणि १६ अधिकारी असे १७० जणांचे मोठे पथक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा बलातर्फे १०० कर्मचारी दादर स्थानकात बंदोबस्ताला होते. दादर स्थानकावर गर्दीचा ताण रोजच्या प्रवाशांवर होवू नये म्हणून रेल्वेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. मध्य रेल्वे पोलिसांकडूनसुद्धा एकूण २१ अधिकारी, २६८ कर्मचारी, स्वेच्छेने येणारे ३० होमगार्डस, ६५ पोलीस मित्र, ७ समन्वयक त्याचबरोबर आंबेडकर कॉलेज, रुईया कॉलेज, कीर्ती कॉलेज आणि सोमय्या कॉलेज या मोठ्या महाविद्यालयांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची मिळून १५० जणांची एनसीसीची टिमसुद्धा सकाळपासूनच या कामाला लागली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -