घरमुंबईरेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांची धरपकड

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांची धरपकड

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यांत आलेल्या लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वे गाड्यांचे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना पकडण्याकरिता रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ई-तिकिटांच्या अवैध व्यवसाय करणाऱ्या आरोपीला उल्हासनगरमधून गुरुवारी अटक केली आहे. आरोपीचे नावं अब्दुल करीम शेख असून त्यांच्याकडून  ३० वैयक्तिक वापरकर्ता आयडी, ३ हजार ७३६  रूपांच्या किमतीची  आधीच्या (जुन्या) प्रवासाची ९ तिकिटे आणि त्याच बरोबर २ सॉफ्टवेअर आरपीएफ पोलिसांनी जप्त केली आहे.

उल्हासनगरमधून दलाला केली अटक   

आरपीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीएफ पोस्ट बदलापूरचे उपनिरीक्षक एस. के. कोल;  कॉन्स्टेबल संजीव गुप्ता,  एम.के. गुप्ता आणि  प्रदीप हिंकुले यांनी मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार  उल्हासनगर येथील ईएमटी कंपनी शहड फाटक येथे राहणा-या ३१ वर्षांच्या अब्दुल करीम शेख नावाच्या व्यक्तीस रेल्वेच्या ई-तिकिटांच्या अवैध धंद्यासाठी अटक केली.  त्या व्यक्तीला त्याच्या सीपीयू व मोबाईलसह बदलापूरला आणण्यात आले. एकूण ३० वैयक्तिक वापरकर्ता आयडी, १३ हजार ७३६  रूपांच्या किमतीची  आधीच्या (जुन्या) प्रवासाची ९ तिकिटे आणि त्याच बरोबर २ सॉफ्टवेअर   विस्तार ( तत्काळअड्डा व ओसीन) ही त्याच्याकडे सापडली.  या संदर्भात त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला बॅग परत

आरपीएफचे जवान  चंदर ठाकूर, यांना एक आरपीएफ हेल्पलाईन -१८२ चा संदेश मिळाला की,  उपनगरीय ट्रेनमध्ये एक बॅग मागे राहून गेली आहे, परंतु ती गाडी अंबरनाथ सायडींगला  जाण्यासाठी निघाली होती. राहुल निकम, आणखी एक कॉन्स्टेबल यांना साइडिंगवर नियुक्त करण्यात आले.  त्यांनी गाडीमध्ये शोध घेतला आणि बॅग पुन्हा मिळविली.  त्यांनी बॅग आरपीएफ पोस्ट अंबरनाथ येथे आणली आणि १८२ हेल्पलाईनवर माहिती  कळवली. नंतर संदीप कुमार सिंह, राहणार अलंकार अपार्टमेंट, आगासन रोड, दिवा नावाची एक व्यक्ती आली आणि त्याने सांगितले की, कुर्ला येथून  दिवा येथे जात असताना आपण आपली बॅग विसरलो आहे. ३ सोन्याच्या अंगठ्या, १ सोनसाखळी, १ जोडी कानातील रिंग, घरचे करारनामा कागद, बँक चेक बुक, एलआयसीची कागदपत्रे आणि ५५०  रुपयांची रोख रक्कम असे एकूण मूल्य रु.१,१०,५५० /-  असलेली बॅग पडताळणीनंतर सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -