घरमुंबईअरविंदा अद्यापही बेपत्ता; इच्छा मरणाची वृद्ध आईची मागणी

अरविंदा अद्यापही बेपत्ता; इच्छा मरणाची वृद्ध आईची मागणी

Subscribe

वसई:-वार्धक्यामुळे हवालदिल झालेल्या ८५ वर्षीय उषा रानडे यांचा मुलगा अरविंद रानडे यांचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. साडेआठ महिन्यांपासून अरविंद बेपत्ता आहेत. त्यातच उषा रानडे रहात असलेली बोरीवलीतील एलआयसी कॉलनीतील त्यांची रूम खाली करण्याची नोटीस एलआयसीने बजावली आहे. मुलगा बेपत्ता, पैशाची चणचण आणि रहाते घर जाण्याची टांगती तलवार यामुळे मेटाकुटीस आलेल्या उषा रानडे यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. माझा मुलगा अरविंदा जीवंत असल्याचा पुरावा द्या, नाहीतर मला मरु द्या, असा आक्रोश त्यांनी केला आहे.

अरविंद रानडे बेपत्ता असल्याचे वृत्त दै. आपलं महानगरने दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजीच्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिसांच्या तपास कामाला वेग आला. मात्र अडिच महिने उलटून गेले तरी पोलिसांना अरविंद यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. अरविंद हे एलआयसीमध्ये कामाला होते. मात्र आठ महिन्यांपासून रानडे कामाला नसल्यामुळे त्यांना कंपनीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पगारही बंद करण्यात आला आहे.काही दिवसांनी नियमानुसार उषाबाईंना कंपनीचे घरही रिकामे करावे लागणार आहे.जवळ पैसा नाही,नातलग नाही,आजारांनी जर्जर झालेले शरीर घेवून कुठे जायचे,कसे जगायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.घरातील अन्न सामुग्री,पदरचे पैसेही संपल्यामुळे उषाबाईंना भाचे पटवर्धन यांच्यासह काही नातलग फंड गोळा करून मदत करताहेत.

- Advertisement -

पटवर्धनांनीही वयाची पंच्चाहत्तरी ओलांडली आहे.त्यांनाही कोणाचा आधार नाही.अशा परिस्थितही अरविंदचा तपास,एलआयसीत खेेटे मारणे,मामीच्या प्रकृतीची,उदरनिर्वाहाची जबाबदारी थकलेल्या शरीराने ते सांभाळत आहेत.त्यांच्या प्रयत्नाने एलआयसी युनियनने 40 हजारांची मदत केली होती. तितकाच आधार उषाबाईंना झाला होता.रानडे बेपत्ता झाल्यापासून तो जीवंत असल्याचा पुरावा द्या नाहीतर मला तरी मरु द्या असा सारखा आक्रोश उषाबाई करीत आहेत.पोलिसांनी अरविंद यांचे फेसबुक,व्हॉट्स अ‍ॅप,मोबाईल डाटा सर्व तपासून झाले. पुण्यापर्यंत जावून शोध घेण्यात आला.अरविंदांनी आपल्या खाजगी गोष्टी कोणालाही शेअर केल्यानसल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत.हा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधीर धायरकर यांनी सुरवातीला केला आता उमेश पाटील करताहेत,मात्र,त्यांच्या हातालाही काही धागेदोरे लागत नाही.एकूणच उषाबाईंच्या आडवे त्यांचे नशीबच येत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -