घरमुंबईबिंद्रे हत्या प्रकरणातील आरोपी फळणीकरचे प्रीतीभोजन

बिंद्रे हत्या प्रकरणातील आरोपी फळणीकरचे प्रीतीभोजन

Subscribe

अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणातील एक आरोपी महेश फळणीकर त्याच्या मैत्रिणीसोबत जेवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांनीच व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. फळणीकर याला कोर्टात साक्षीला आणल्यानंतर परत नेताना त्याने पोलीस सिक्युरिटीत हा जेवणाचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप राजू गोरे यांनी केला आहे.

पीएसआय अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर यानेच बिंद्रे यांची हत्या झाल्याची कबुली दिली होती. हे हत्याकांड कसे घडले हे त्याने पोलिसांना पुराव्यानिशी सांगितले. त्यामुळे या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोर शिक्षा होण्यास महेश फळणीकरचा कबुलीजबाब महत्त्वाचा ठरणार आहे.

- Advertisement -

हत्या प्रकरणातील तसेच इतर गुन्ह्यांतील आरोपींना कोर्टात घेऊन जाताना आणि पुन्हा तुरुंगात आणताना पोलीस पार्ट्यांसाठी काही नियम केले आहेत. परंतु हे नियमच धाब्यावर बसवून पोलीस आरोपींवर कसे मेहेरबान होतात, हे या व्हायरल व्हिडिओमुळे उघड झाले आहे. कोर्टाच्या आवारात आरोपी महेश फळणीकर याला त्याची मैत्रिण भेटायला आली. यावेळी एका शेडखाली या दोघांनीही बैठक मारून प्रीतीभोजन केले. मैत्रिणीने त्याच्यासाठी आवडते पदार्थ त्या डब्यामध्ये आणले होते. त्याचवेळी त्याला कोर्टात नेणारे पोलीस मात्र आरामात बसून गप्पा मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. कुंदन भंडारी याच्या जामीन अर्जावर त्याचे वकील बाबा इंदुलकर यांनी युक्तिवाद केला आहे. सोमवार, १४ जानेवारीला सरकारी वकील संतोष पवार आपला युक्तिवाद करणार आहेत. १४ जानेवारीला जेलबदली तसेच कुंदन भंडारीच्या जामीन अर्जावर आणि राजू पाटील यांच्या दोषमुक्त अर्जावर सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. मल्लशेट्टी यांच्या कोर्टात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -