घरमुंबईमॉडेल-अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करुन मारहाण

मॉडेल-अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करुन मारहाण

Subscribe

अंधेरीतील घटना; प्रोडेक्शन मॅनेजरला अटक व कोठडी, अश्लील फोटो-व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करुन बलात्कार

मॉडेल-अभिनेत्री असलेल्या एका २८ वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिला मारहाण केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारहाणीसह बलात्काराचा गुन्हा नोंद होताच एकलव्यसिंग धर्मवीरसिंग तक्षक (२७) नावाच्या एका प्रोडेक्शन मॅनेजरला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने गुरुवार २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत महिलेशी शारीरिक संबंधादरम्यान एकलव्यसिंगने अश्लील फोटोसह व्हिडीओ काढले असून तेच व्हिडीओ आणि फोटो दाखवून तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

पिडीत महिला ही अंधेरी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून ती मॉडलिंग तसेच अभिनेत्री म्हणून काम करते. तिने काही हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. एक वर्षांपूर्वी तिची अमीत गुप्ता यांच्या मध्यस्थीने एकलव्यसिंग याच्यासोबत ओळख झाली होती. आपण निर्माता असून एक शॉर्ट फिल्म तयार करीत आहेत, या फिल्मसाठी आपल्याला एका अभिनेत्रीची गरज आहे असे त्याने पिडीत महिलेला सांगितले होते. या ओळखीनंतर ती त्याच्या संपर्कात होती.

- Advertisement -

शॉर्ट फिल्मचे आमिष

एकलव्यसिंगने त्याची एका शॉर्ट फिल्मसाठी निवड केली होती. त्यानंतर फिल्मच्या शुटींगसाठी ते दोघेही हरियाणा येथील रोहतक शहरात गेले होते. पंधरा दिवस तिथे शूटींगचे काम चालले. याच दरम्यान ते दोघेही गुडगाव येथील हॉटेलमध्ये गेले होते. तिथेच त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचे त्याने काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनविले होते. या प्रकारानंतर तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. तसेच यापुढे कॉल करु नकोस अशी सक्त ताकिद त्याला दिली होती. मात्र तो तिला तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत होता.

ब्लॅकमेल करून अत्याचार

त्यानंतर त्याने तिच्यावर अनेकदा विविध हॉटेल आणि लॉजमध्ये लैंगिक अत्याचार केला होता. तिच्या घरासमोर येऊन तो नेहमीच धिंगाणा घालत होता. १४ फेब्रुवारीला व्हेलटाईन डे असल्याने त्याने तिला भेटायला बोलाविले होते. दिवसभर ती त्याच्यासोबत होती. यावेळी त्याने कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. रात्री उशिरा तो तिला घेऊन मालाड येथील इन्फिनिटी मॉल परिसरात आला होता. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली होती.

- Advertisement -

मारहाणीनंतर पोलीस तक्रार

एकलव्यसिंगकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी मारहाण, बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -