घरमुंबईमातोश्रीच्या दारातील बंडखोरीला शिवसेनेकडून अभय

मातोश्रीच्या दारातील बंडखोरीला शिवसेनेकडून अभय

Subscribe

१४ जणांची पक्षातून हकालपट्टी,तृप्ती सावंतसह राजूल पटेल,संजय भालेराव अजून पक्षातच ,ग्रामीण भागात शिवसेनेची कारवाई

विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरुद्ध बंडखोरी करणार्‍या तब्बल १४ शिवसेना पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कठोर कारवाई करत बंडखोरी करणार्‍यांना पक्षा बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण, या यादीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या दारातील बंडखोरीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेविरोधात बंडखोरी करणार्‍या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचे नाव वगळण्यात आले आहे. तृप्ती सावंतनंतर राजूल पटेल, संजय भालेराव या बंडखोरांवर कारवाई करण्यात आलेली नाही.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निष्ठावंतांना डावलले म्हणून अनेक नाराज शिवसैनिकांनी बंडखोरी केली. तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने भाजपबरोबर युती केल्यामुळे सेनेचे इच्छुक उमेदवार नाराज झाले असून हि नाराजी राज्यभर दिसत आहे. नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला तिकीट मिळालेले नाही.

- Advertisement -

हकालपट्टी केलेल्या बंडखोरांची नावे : प्रकाश कौडगे – नांदेड दक्षिण विधानसभा, बाबुराव कदम कोहळीकर – हदगाव विधानसभा, महेश कोठे – सोलापूर मध्य विधानसभा, मनोज शेजवळ – मोहोळ विधानसभा, कैलास पाटील आणि इंदिरा पाटील – चोपडा विधानसभा, अण्णासाहेब माने आणि संतोष माने- गंगापूर विधानसभा, विजयराज शिंदे, सिंधुताई खेडेकर,अर्जुन दांडगे – बुलडाणा विधानसभा, अनिरुद्ध रेडेकर – चंदगड विधानसभा, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगराज – कोल्हापूर उत्तर विधानसभा, संदीप दबडे – हातकणंगले, शानाभाऊ सोनावणे – सिंदखेडा विधानसभा, राम पाटील – जिंतूर विधानसभा, डॉ. संजय कच्छवे – पाथरी विधानसभा, विशाल होबळे – केज विधानसभा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -