घरमुंबईCorona: सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शीव रुग्णालयात उपचारादम्यान मृत्यू

Corona: सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शीव रुग्णालयात उपचारादम्यान मृत्यू

Subscribe

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २८ वर...

सांताक्रुज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा सोमवारी दुपारी शीव रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी दुजोरा दिला आहे.

त्यांच्या मृत्यूने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्य पोलीस दलातील संख्या आता २८ झाली असून त्यात मुंबई पोलीस दलातील १९ पोलिसांचा समावेश आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे धारावी येथील शीव-कोळीवाडा परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडली होती, २८ मे रोजी त्यांना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियासोबत सांताक्रुज पोलिसांना देण्यात आली.

- Advertisement -

हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोरोनाचे मुंबई पोलीस दलातील १९वे बळी ठरले आहे तर राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत २७ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान त्यांच्या निधनाने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.


सोसायटीच्या अध्यक्षाला पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -