घरमुंबईवातावरणात एलर्जीचे घटक वाढल्यामुळे लहान मुलांना होतोय अस्थमा

वातावरणात एलर्जीचे घटक वाढल्यामुळे लहान मुलांना होतोय अस्थमा

Subscribe

भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय उपस्थित केला होता. याला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले असून त्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

वातावरणातील विविध घटकांमुळे एलर्जी होऊन अस्थमा रोग बळावतो. या घटकांमध्ये वाढ झाल्यामुळे सध्या बालकांमध्ये अस्थमाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. २००८ साली लहान मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण ५.५ टक्के एवढे होते. ते वाढून २०१८ मध्ये १५ टक्के झाले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय उपस्थित केला होता. याला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले असून त्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

अस्थमा झालेल्या मुलांची आकडेवारी

आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) नूसार २०१७-१८ वर्षात एकूण ४ हजार १८५ आणि २१०८-१९ मध्ये ६ हजार ८८६ इतक्या बालकांना अस्थमा असल्याचे निदर्शनास आले आहे. तर चालू वर्षात मे २०१९ च्या अखेर ० ते ५ वयोगटातील २, ४०१ मुंबईतील बालकांना, पुण्यात १, १२१, नाशिकमध्ये ३८७ आणि पालघरमध्ये ४८५ बालकांना अस्थमा झाले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

आरोग्य संस्थांमार्फत उपचार सुरु

बालकांमध्ये वाढणार्‍या अस्थमा रोगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील ० ते ६ वयोगट आणि शाळेतील ६ ते १८ वयोगटातील मुला-मुलींची तपासणी करण्यात येते. २०१८-१९ या वर्षात ० ते ६ वयोगटातील ६० लाख ७३ हजार ५४२ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३ हजार २३३ बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच विविध आरोग्य संस्थांमार्फत अशा बालकांवर उपचार केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -