घरताज्या घडामोडीमुंबई पुन्हा प्रदुषण वाढले, हवेची गुणवत्ता खालावली!

मुंबई पुन्हा प्रदुषण वाढले, हवेची गुणवत्ता खालावली!

Subscribe

गेले काही महिने मुंबईची स्वच्छ झालेली हवा आता पुन्हा दुषित होऊ लागली आहे. मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाली हे रविवारच्या हवेच्या गुणवत्तेवरून दिसून आलं. रविवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० वर पोहोचला होता. या आधी कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता ५० ते ६० निर्देशांक नोंदवली गेली होती. त्यानंतर आथा रविवारी निर्देशांकाने १०० री गाठली. बोरिवली, मालाड, अंधेरी, वरळी, माझगाव येथे हवेचा दर्जा घसरुन मध्यम नोंदला गेला तर वांद्रे-कुर्ला संकुल येथे हा दर्जा अती वाईट नोंदवला गेला. मुंबईतील कुलाबा, चेंबूर आणि भांडुप या तीन केंद्रांवर हवेचा दर्जा समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. उकाड्यासोबतच मुंबईमध्ये रविवारी ठिकठिकाणी धुरकेही जाणवले.

वांद्रे – कुर्ला संकुलमध्ये पीएम २.५ या प्रदुषकांची पातळी ३०४ नोंदवली गेली. तर पीएम १० ची पातळी १२८ होती. बोरिवलीमध्ये पीएम १० आणि पीएम २.५ या दोन्ही पातळी १३५ च्या पुढे होती. मालाडमध्ये पीएम २.५ ची पातळी १३५ होती तर पीएम १० ची पातळी १०६ होती. अंधेरीमध्ये पीएम २.५ ची पातळी १०१ नोंदली गेली. वरळीमध्ये ओझोनचे प्रमाण ११८ होते. तर माझगावमध्ये पीएम १० चे प्रमाण १०८ होते.

- Advertisement -

अनलॉक-४ च्या काळामध्ये वाहतुकीमध्येही वाढ झाली आहे. पीएम २.५ आणि पीएम १० या सर्वात जास्त घातक प्रदूषकांमध्ये झालेल्या वाढीमुळे वाहतुकीने केलेला परिणामही अधोरेखित होत आहे.


हे ही वाचा – मुंबई, ठाण्यात पावसाचं दमदार पुनरागमन; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -