घरमुंबईअटक केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा एटीएसकडून छळ - संजीव पुनाळेकर

अटक केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा एटीएसकडून छळ – संजीव पुनाळेकर

Subscribe

मुंबईसह पुणे, सातारा आणि नालासोपाऱ्यात घातपात घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना एटीएसने अटक केली. अटक केलेल्या या तीन जणांचा एटीएसकडून छळ केला जात असल्याचा आरोप सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.

दहशतवादी विरोधी पथकाने अटक केलेल्या तीन जणांचा छळ सुरू असल्याचा आरोप सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहेमुंबईसह पुणे, सातारा आणि नालासोपाऱ्यात घातपात घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना एटीएसने अटक केली होती. वैभव राऊतसह तीन जणांना एटीएसने अटक केली होती. या तीन जणांचा पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप त्यांनी केला असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे.

वैभव राऊतला वकिल मिळू नये म्हणून प्रयत्न

वैभव राऊत याला अटक होईन आता ३६ तासांच्यावर उलटले तरी देखील त्याच्या घरच्यांना माहिती मिळत नाही. तसेच त्याला वकील मिळू नये म्हणून प्रयत्न होत असल्याचा आरोपही पुनाळेकर यांनी केला आहे. पानसरे, दाभोळकर प्रकरणामध्ये ज्यांना पकडलंय त्यांची केस सरकार चालवत नाही. तसेच ज्यांना पकडत आहे त्यांना वकील सरकार मिळवू देत नाही. हा अन्याय नाही तर काय असा गंभीर आरोप देखील पुनाळेकर यांनी यावेळी केलाय.

- Advertisement -

पोलिसांकडून केली जातेय मारहाण

याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांना मारहाण करण्यात येते आहे. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शरद कळसकर हा मूळचा औरंगाबादचा आहे. सुधन्वा जोगळेकर हा संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित आहे. मात्र या सगळ्यांना मारहाण करण्यात येते आहे. चौकशीच्या नावाखाली या सगळ्यांना मारहाण करण्यात येते आहे असे पुनाळेकर यांनी म्हटले आहे.

१२ जणांना घेतलं ताब्यात

दरम्यान, नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धरपकड अद्यापही सुरु आहे. घातपात कटप्रकरणी संपूर्ण राज्यभरात धाडसत्र सुरु असून एकूण १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -