घरमुंबईहातावर शस्त्रक्रिया होऊनही निवडणूक कर्तव्यावर हजर!

हातावर शस्त्रक्रिया होऊनही निवडणूक कर्तव्यावर हजर!

Subscribe

कर्तव्यनिष्ठ उपजिल्हाधिकारी डॉ. दादाराव दातकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

“निवडणुकीची जबाबदारी सांभाळताना कर्तव्यावर असताना अचानक पाय घसरून पडल्याने उजवा हात फ्रॅक्चर झाला. परंतु, काहीही झालं तरी ‘आधी लग्न कोंढाण्याचे…’ या उक्तीप्रमाणे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचेच, या भावनेने पुन्हा कामावर त्याच उत्साहाने व जोशाने हजर झालो” असे मुंबई उपनगर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी असलेले व सध्या १७२ – अणुशक्तीनगर मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले डॉ. दादाराव सहदेवराव दातकर सांगत होते. कर्तव्यनिष्ठ उपजिल्हाधिकारी डॉ. दादाराव दातकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

“२६ सप्टेंबर २०१९ रोजी आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर) स्पोर्टस कॉम्प्लेक्स लोरेटो स्कूल, चेंबूर येथे मतदान केंद्र साहित्य वाटप जमा करणे व ई.व्ही.एम. स्ट्राँगरुम निश्चित करण्यासाठी जाताना रात्री ८ वाजता रॅम्पवरून अचानक पाय घसरून दोन फूट खड्ड्यात फेकलो गेलो. आरसीएफ, चेंबूर येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार घेतले. त्यानंतर रात्री ब्रीच कॅन्डीमध्ये तात्पुरते प्लॅस्टर करण्यात आले. दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज स्वीकारणासाठी १७२ – अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात तात्काळ हजर झालो. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पुन्हा ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल होऊन रात्री डॉ. वेंगसरकर यांनी माझ्या हाताच्या मनगटामध्ये साडेचार इंचाची प्लेट टाकून शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यासाठी तात्काळ हजर झालो.” अशी माहिती दातकर यांनी दिली.

- Advertisement -

यापूर्वी दोन वेळा गौरव

यापूर्वी दोन वेळा डॉ. दातकर यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांच्याकडून गौरविण्यात आले आहे. तसेच औरंगाबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत असताना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत विभागीय स्तरावर त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तसेच जनगणनेचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रपतीकडून त्यांना रजत पदकसुद्धा मिळाले आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई म्हणून कार्यरत असताना उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा महसूलमंत्र्यांकडून गौरवही झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -