मेट्रो प्रकल्पासाठी ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टिम

Mumbai
ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टिम

मुंबईतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील मेट्रो प्रकल्पाच्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टिमसाठी एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. विद्युत आणि अभियांत्रिकीच्या कामासाठी कंत्राटदाराची शिफारस या समितीकडून करण्यात आली. तिन्ही मार्गावरील ५२ स्थानकांचे कामही कंत्राटदार कंपनीची जबाबदारी असेल. डाटामटिक्स ग्लोबल सर्व्हीसेस, ए ई पी टिकेटिंग सोल्यूशन या कंपनीची शिफारस समितीने केली आहे.

विद्युत आणि यांत्रिकीच्या कामामध्ये कामकाजाचे डिझायनिंग, साहित्य पुरवठा, प्रकल्प उभारणी आणि चाचणी यासारख्या कामांचा समावेश या कंत्राटात आहे. या कामासाठी स्टर्लिंग एण्ड विल्सन या कंपनीची नेमणूक समितीने केली आहे. कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव डी.के. जैन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो ७ च्या कामाअंतर्गत १३ उन्नत स्थानकांसाठी अग्निरोधक उपाययोजना करण्याचे काम या कंत्राटात अपेक्षित आहे.

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत १८.५ किमीच्या दहिसर ते डी एन नगर मेट्रो मार्गिका क्रमांक २ अ, २३.५ किमी डी एन नगर ते मानखुर्द मेट्रो मार्गिका २ ब, १६.५ किमी दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो प्रकल्पाच्या अभियांत्रिकी व विद्युत यंत्रणेच्या कामासाठी कंत्राटदाराची शिफारस या समितीकडून करण्यात आली आहे. आमचे प्रकल्प मुदतीमध्ये पूर्ण व्हावेत तसेच प्रवाशांना आरामदायी आणि सोयीस्कर सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए राजीव यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here