घरमुंबईआज बाळासाहेब असायला हवे होते - राज ठाकरे

आज बाळासाहेब असायला हवे होते – राज ठाकरे

Subscribe

अयोध्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

देशभरात अयोध्या निकालावरून प्रतिक्रिया येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण आहे. या निकालामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधलं जावं. पण यावेळी फक्त एकच वाटतं, यावेळी बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते’, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी यावेळी दिली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात राखून ठेवलेला निकाल अखेर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दिला. यामध्ये वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचं न्यायालयानं मान्य केलं. त्या ठिकाणी मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करण्याचे निर्देश सरकारला न्यायालयाने दिले आहेत.


Ayodhya Verdict : जागा रामलल्लाचीच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातले महत्त्वाचे मुद्दे!

गेल्या महिन्यात १६ ऑक्टोबरला संपलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतली होती. यानंतर यासंदर्भातला निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. मध्यंतरी आलेला दिवाळीचा उत्सव आणि महाराष्ट्र तसेच हरयाणामधल्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर निकाल राखून ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता. अखेर आज तो निर्णय आला असून या निर्णयानुसार वादग्रस्त जागी राम मंदिर बांधण्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

- Advertisement -

Raj Thackeray on Ayodhya Verdict

काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

निकाल सुनावताना न्यायालयाने वादग्रस्त जागेवरचा निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावला. तसेच, वादग्रस्त जागी जरी राम मंदिराच्या उभारणीचा निर्वाळा न्यायालयाने दिला असला, तरी अयोध्येमध्येच मुस्लीम पक्षकारांना मशीद उभारणीसाठी मोक्याच्या ठिकाणी ५ एकरची जागा देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने सरकारला दिले आहे. त्यामुळे हा निकाल दोन्ही बाजूंमध्ये संतुलन राखणारा असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -