घरमुंबईराजभवनावर मोर्चा काढणारे आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

राजभवनावर मोर्चा काढणारे आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे राज्यातील शेतकऱ्यासाठी राजभवनावर काढण्यात आलेला मोर्चा वाटेत अडवण्यात आला असून आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे राज्यातील शेतकऱ्यासाठी राजभवनावर काढण्यात आलेला मोर्चा वाटेत अडवण्यात आला असून आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत बच्चू कडू यांनी राजभवनावर मोर्चा काढला असता पोलिसांनी हा मोर्चा हाणून पाडला आहे. मात्र राजभवनावरील मोर्चा अडवला असला तरी आता मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन मोर्चा काढणार, अशी प्रतिक्रिया ताब्यात घेतल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली आहे.

- Advertisement -

यावर बच्चू कडू म्हणाले की,

आपण पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट पोहोचू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी नाराजी दर्शवत दिला आहे. तसेच राज्यभवनावर मोर्चा काढू दिला नसल्याने आता आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाच जणांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन भेट घेणार होते, त्यालाही नकार देण्यात आला असल्याचे कडू यावेळी म्हणाले. त्यामुळे आता सांगून आलो होतो, यापुढे न सांगता आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार नाही का? असा सवाही बच्चू कडू यांनी विचारला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत तसंच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी, अशा काही मुख्य मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक झाले असून राजभवनावर मोर्चा आयोजित केला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. मात्र राजभवनावर पोहोचण्याआधीच नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा अडवण्यात आला. बच्चू कडू यांच्यासह अनेक आंदोलकांना विविध परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी पोलिसांनी बच्चू कडू यांनी मोर्चा आयोजित करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. त्यांना कलम १४९ ची नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही आपण मोर्चा काढणारच असे बच्चू कडू यांनी सांगितले होते. यामुळे पोलिसांनी नरिमन पॉईंट येथेच बच्चू कडू यांचा समर्थकांसबोतचा मोर्चा अडवला. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा –

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव तर ठाणे मनपात नरेश म्हस्केंची वर्णी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -