बॅग पकड जगह बना;रेल्वेकडून नो रिस्पॉन्स !

मुंबई म्हणजे धावपळीचे शहर. या धावपळीला अधिक वेगवान बनवतात त्या मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकलगाड्या. या लोकलमध्ये बरीच गर्दी असते. या लोकलमधील गर्दीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी २०१२ मध्ये निशांत बंगेरा या तरुणाने एमयुएसई ही संस्था स्थापन करून ‘बॅग पकड जगह बना’ अशा नावाचे अभियान सुरु केले.

Mumbai
bag pakad jagah bana
बॅग पकड जगह बना’ अशा नावाचे अभियाचे सदस्य

मुंबई म्हणजे धावपळीचे शहर. या धावपळीला अधिक वेगवान बनवतात त्या मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकलगाड्या. या लोकलमध्ये बरीच गर्दी असते. या लोकलमधील गर्दीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी २०१२ मध्ये निशांत बंगेरा या तरुणाने एमयुएसई ही संस्था स्थापन करून ‘बॅग पकड जगह बना’ अशा नावाचे अभियान सुरु केले. मात्र या अभियानाला रेल्वेकडून सहकार्य न मिळाल्याने हे अभियान मागे पडले आहे. प्रवाशांनी हलक्या व छोट्या बॅग वापराव्यात, तसेच त्या आसनाखालील जागेत ठेवाव्यात जेणेकरून प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळेल, असा आशय या अभियानाचा आहे.

लोकलच्या डब्यांमधून अनेकजण आकाराने मोठ्या खांद्यावर लटकणार्‍या बॅगा घेऊन प्रवास करत असतात. त्यामुळे पुष्कळ जागा व्यापली जाते. गर्दीच्या वेळी या बॅगा मोठे अंगदुखी आणि डोकेदुखी ठरते. यावर काही मार्ग निघावा म्हणून निशांत बंगेरा यांनी बॅग पकड जगह बना हे अभियान २०१२ मध्ये सुरु केले. २०१४, २०१७ आणि २०१८ मध्ये त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला या अभियानात सहकार्य करण्यास विनंती केली होती. मात्र रेल्वेकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरी सुद्धा हे अभियान ते राबवत असतात.

काय आहे हे अभियान ?
दोन हजार प्रवासी क्षमता असलेल्या डब्यांमधील सहा ते सात हजार प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये अधिक प्रवासी आकाराने मोठी आणि वजनाने जड असलेल्या बॅगा घेऊन प्रवास करतात. प्रवाशांच्या एका बॅगांमुळे जागा कमी होते. त्यामुळे डब्यात अधिक गर्दी होते. प्रवाशांनी हलक्या व छोट्या बॅग वापराव्यात, तसेच त्या आसनाखालील जागेत ठेवाव्यात जेणेकरून प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळेल. सद्यस्थितीत मध्य,हार्बर, ट्रान्स आणि पश्चिम रेल्वेवर दिवसभरात ३ हजार ८७ फेर्‍या चालवल्या जात आहेत. प्रत्येक दिवशी लोकलच्या तिन्ही मार्गावर ७७ लाखा पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. दरवर्षी प्रवासी संख्या वाढत आहे.

रेल्वेचा प्रतिसाद नाही
मी ५ वर्षांपासून या अभियानाच्या माध्यमातून लोकल प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. या अभियानात रेल्वेनेसुद्धा सहभागी होण्याची आम्ही विनंती केली होती. मात्र रेल्वेकडून प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईकरांनी हे अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे. ज्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये उभे राहण्यास त्रास होणार नाही. जनजागृतीच्या दृष्टीने विविध पर्यायही निवडले. इतकेच नव्हे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडेही अर्जद्वारे या संबंधी भूमिका मांडली होती. सोबतच रेल्वे अनाऊन्समेंटच्या वेळी प्रवाशांना या अभियानात सहभागी होण्यास सांगावे, अशी या टीमची मागणी होती, मात्र रेल्वेने प्रतिसाद दिला नाही.
– निशांत बंगेरा, सामाजिक कार्यकर्ता.

मध्य रेल्वे (दर दिवशी)

एकूण लोकल गाड्या =१३३
लोकल फेर्‍या = १७३२
प्रवासी संख्या = ४२ लाख
लोकलची क्षमता =२ हजार
गर्दीच्या वेळी ५ ते ७ हजार प्रवाशी (एका लोकलमध्ये )

पश्चिम

एकूण लोकल गाड्या =१०१ (८९)
लोकल फेर्‍या = १३५५
प्रवासी संख्या = ३५ लाख
लोकलची क्षमता =१५००
गर्दीच्या वेळी ५ ते ७ हजार प्रवासी