घरमुंबईबाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र दीपस्तंभ ठरेल - उदय सामंत

बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र दीपस्तंभ ठरेल – उदय सामंत

Subscribe

जनमानसांवर अधिराज्य गाजविणारे थोर व्यक्तिमत्व, व्यंगचित्रकार आणि द्रष्टे विचारवंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात सुरू केलेले अध्यासन केंद्र दीपस्तंभ म्हणून उभे राहणार आहे.

जनमानसांवर अधिराज्य गाजविणारे थोर व्यक्तिमत्व, व्यंगचित्रकार आणि द्रष्टे विचारवंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात सुरू केलेले अध्यासन केंद्र दीपस्तंभ म्हणून उभे राहणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून पुढील पीढीला उर्जा आणि प्रेरणा मिळेल असा आशावाद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या ‘स्मृतिगंध’ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॅा. स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॅा. विनोद पाटील यांच्यासह विविध प्राधिकरणांतील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अतूलनीय योगदान दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाने सुरू झालेल्या या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून अनेक विषयावर सखोल अभ्यास करून एक आदर्शवत पीढीच्या निर्माणासाठी या केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देतांना राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर म्हणाले की, बाळासाहेबांचे कार्य, त्यांची शिकवण आणि त्यांच्या कार्यांची ऊर्जा घेऊन पुढील पीढीला आदर्शप्रवण बनविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी तत्कालिन शासनाच्या वेळी प्रस्ताव सादर करून हे केंद्र नावारूपाला आणण्यात आले आहे , यासाठी शासनाने भरघोस आर्थिक तरतूदही केली आहे. एक महत्त्वपूर्ण अध्यासन केंद्र म्हणून हे केंद्र नावारूपाला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रखर भाषेतून युगप्रवर्तक विचार मांडणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची ऊर्जा अनेकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॅा. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करून नव नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. याबरोबरच युवकांतील कला गुणांचा विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास, आपातकालिन व्यवस्थापन अशा विविध विषयांचा अभ्यास या केंद्राच्या माध्यमातून केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्र- कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी केले तर सुत्रसंचालन डॅा. नीतिन आरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात आले होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -