घरमुंबईमंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी

मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी

Subscribe

राज्य सरकारने नवीन वर्षात कर्मचार्‍यांना ड्रेस कोडपासून ऑफिसच्या वेळेपर्यंत शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये कोणत्याही वेळेत चहा पिताना चकाट्या पिटणार्‍या कर्मचार्‍यांवरही बंधने लादण्यात आली आहेत. अधिकारी, कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीमधील कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास आणि विक्री बंद करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

मंत्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारतींमध्ये काम करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना कँटीनमार्फत चहा पुरवला जातो. मंत्रालयातील कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांसाठी कॉरिडॉरमध्ये चहाची विक्री होते. राज्याच्या कानाकोपर्‍यातून मंत्रालयात व्हिजिटर्स वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी येतात. अनेकदा चहा पिण्यासाठी कॉरिडॉरमध्ये गर्दी होते.

- Advertisement -

कोणत्याही वेळेत चहा पिण्यासाठी झुंबड उडालेली असते. त्यामुळे कार्यालयातील शिस्त बिघडल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे कॉरिडॉरमध्ये चहाची विक्री न करता सहाव्या, तिसर्‍या मजल्यावरून कँटीनमधील कर्मचारी ट्रेमधून चहा पुरवतील. सकाळी साडेनऊ ते साडेदहा आणि दुपारी तीन ते चार या वेळेतच चहा पुरवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -