घरCORONA UPDATELockdown: 'वांंद्रेतील मजूरांना जीवनावश्यक वस्तूंसोबत मोबाईल रिचार्जचीही चिंता'

Lockdown: ‘वांंद्रेतील मजूरांना जीवनावश्यक वस्तूंसोबत मोबाईल रिचार्जचीही चिंता’

Subscribe

काल वांद्रे स्टेशन परिसरात बांधकाम मजूर आणि कामगारांचा जो जमाव गोळा झाला होता. त्यानंतर आज भाजप नेते आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांनी या मजुरांच्या विविध संस्था-संघटना यांच्याशी संवाद साधला. त्यातून विविध बाबी समोर आल्या. मजुरांच्या अडचणींबाबत शेलार यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून हे मुद्दे सरकारच्या लक्षात आणून दिले आहेत. “मोबाईलचा रिचार्ज संपत आला आहे आणि रिचार्ज करता येत नाही. त्यामुळे नातेवाईकांशी संपर्क साधता येत नाही, म्हणून मजुर अस्वस्थ झाले आहेत.”, अशी बाब शेलार यांनी पत्राद्वारे अधोरेखित केली आहे.

वरकरणी अत्यंत छोटा पण या कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचा नवा मुद्दा समोर आला आहे. वांद्रे येथे जमलेले बहुतांश कामगार हे “प्रीपेड मोबाईल” वापरतात. त्यांच्या मोबाईलचे रिचार्ज आता संपत आले आहे. मोबाईल रिचार्ज करण्याची दुकाने सुरु नाहीत. ऑनलाईन रिचार्ज करणे सर्वांना शक्य नाही किंवा जमत नाही. त्यामुळे त्यांचा त्यांच्या गावाशी, नातेवाईक आणि मुकादमाशी असलेला संपर्क तुटू लागला आहे. त्यातून अस्वस्थता वाढते आहे. याबाबत काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिले.

- Advertisement -

या पत्रात आशिष शेलार यांनी काही आरोप देखील केले आहेत.

– एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमूनही राज्याच्या गुप्तहेर खात्याला याची भणक लागू नये, हे गृहखात्याचे अपयश असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

– जमलेले सर्व मजूर यांना कुणीतरी नियोजन पद्धतीने वांद्रे येथे आणले होते. यामागे कुणाचा हात आहे, हे शोधले पाहीजे.

– स्थलांतरीत मजुरांना राज्य सरकारकडून जेवण किंवा अन्नधान्य मिळालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

– तसेच राज्याचा कामगार विभाग किंवा कामगार कल्याण मंडळाने देखील या कामगारांची दखल घेतलेली नाही. २४ मार्च २०२० रोजी केंद्रीय कामगार मंत्रालयाने सर्व कामगारांची देखभाल घ्यावी, असे आदेश दिलेले आहेत.

आशिष शेलार यांनी केलेल्या मागण्या –

– मजूर जमण्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी झाली पाहीजे. वांद्रे येथून बाहेर गावी ट्रेन जात नाही. मग मजूर येथेच का आले होते?

– या मजूरांना जेवण आणि अन्नधान्यासारख्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

– मजूरांना काही प्रमाणात आर्थिक मदत देण्यात यावी.

– अनेक मजूरांकडे प्रीपेड मोबाईल असून त्यांचे रिचार्ज संपले आहे. मोबाईलची दुकाने बंद असल्यामुळे त्यांना रिचार्ज करता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -