घरमुंबई'माय महानगर'चा दणका, वांद्र्याच्या भुयारी मार्गाची होणार दुरुस्ती!

‘माय महानगर’चा दणका, वांद्र्याच्या भुयारी मार्गाची होणार दुरुस्ती!

Subscribe

माय महानगरने दाखवलेल्या बातमचा दणका. वांद्रे पूर्व- सांताक्रुझ येथील अस्तित्वात असलेले भुयारी मार्गाच्या दुरावस्थेबद्दल माय महानगरने बातमी केली होती. या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. लवकर हा भुयारी मार्गाची दुरुस्ती होणार आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाने दुरुस्ती करण्याचे हमीपत्र माय महानगरच्या हाती दिले आहे.

वांद्रे पूर्व- सांताक्रुझ येथील अस्तित्वात असलेले भुयारी मार्गाच्या दुरावस्थेबद्दल माय महानगरने बातमीने पाठपुरावा केला होता. या प्रलंबित दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव पीडब्ल्यूडीने राज्य सरकारकडे पाठवला आहे. हे काम त्वरित सुरू करण्याचे पीडब्ल्यूडी प्रशासनाने हमीपत्र माय महानगरच्या हाती दिले आहे. महानगरच्या या दणक्याने प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त माय महानगर देणार अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.

- Advertisement -

धोकादायक भुयारी पादचारी मार्ग

हजारो विघार्थ्यांचा जीव धोक्यात…जबाबदार कोण? पीडब्ल्यूडी की महापालिका की सत्ताधारी? धोकादायक भुयारी पादचारी मार्गाबद्दल माय महानगरने आवाज उठवला होता. मुंबईतील फ्लायओव्हरचे अंधेरी गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर स्ट्रकचरल ऑडिट करण्याचे काम मुबंई महापालिका, रेल्वे आणि पीडब्ल्यूडी विभागाने सुरू केले होते. मात्र पश्चिम द्रुतगती मार्गावर असणाऱ्या सांताक्रूझ वांद्रे इथला गव्हर्मेंट कॉलोनीजवळील कार्डिनल स्कुल ते खार पाईप लाईन, निर्मलनगर भुयारी पादचारी मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे गळती सुरू झाली आहे. ही गळती थीम वॉटर पार्कच्या धबधब्या प्रमाणे होत असल्याने या भुयारी मार्गाचा वापर करणारी शाळेतील मुलं आणि प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत होती. या धोकादायक भुयारी पादचारी मार्गाचा आढावा माय महानगरने घेतला होतां

विद्यार्थी आणि पालक जीव मुठीत घेऊन करत आहे प्रवास

वांद्रे पूर्व येथे पश्चिम द्रुतगती मार्गा खालून जाणाऱ्या भुयारी पादचारी मार्ग म्हणजे,’थीम वॉटर पार्क’ वांद्रे पूर्व विघानसभेत शिवसेनेचे २ आमदार,५ नगरसेवक, आणि महापौर असताना देखील काय करुन दाखवलं? अशी टीका मनसेचे राज्य कार्यकारणी सदस्य अखिल चित्रे यांनी केली आहे. दररोज हजारो विद्यार्थी आणि पालकवर्ग तसेच नागरिक जीव मुठीत घेऊन चालत आहेत. भुयारी मार्ग इतक्या धोकादायक स्थितीत आहे की, कोणत्याही क्षणी दुर्दैवी अपघात घडू शकतो. कार्डिनल ग्रशिअस हायस्कूल आणि न्यु इंग्लिश स्कूल ते खार स्टेशन जाण्यासाठी हा एकमेव पर्यायी भुयारी पादचारी मार्गाच्या भिंतीला तडे गेले असून पाणी गळत आहे. तसेच भिंतीत झालेल्या छिद्रातून एखाद्या धबधब्यासारखे पाणी वाहत होते.

- Advertisement -

माय महानगरच्या बातमीचा दणका

यानंतर मनसेने पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आणले. त्यानंतर पीडब्ल्यूडीच्या विभागीय अभियंत्यांनी पाहणी करन ४८ तासात इथल्या भुयारी पादचारी मार्गाचा निर्णय घेण्याचा इशारा मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. या पादचारी भुयारी मार्ग थीम वॉटर पार्क बंद करण्यासंदर्भात मनसेनं पीडब्ल्यूडी, महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले होते. झोपलेल्या पीडब्ल्यूडीला आणि राज्यसरकारला माय महानगरने जागं केले आहे. या माय महानगरच्या दणक्याने वांद्रे पूर्व -सांताक्रुझ येथील अस्तित्वात असलेले भुयारी मार्गांची दुरावस्थे बद्दल दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव पीडब्ल्यूडीने राज्य सरकारकडे पाठवला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -